Shivsena Vs BJP : भाजपला जळी-स्थळी-पाषाणी ठाकरेच दिसतात; बावनकुळेंच्या प्रश्नावर दानवेंचा टोला

Lok Sabha Election 2024 : बावनकुळे साहेब, राज्यात तुमचे म्हणजेच भाजपचे सरकार आहे, दहा वर्षांपासून राज्य तुमचे आहे. उत्तर तर तुम्ही द्यायला हवी! हिंमत असेल तर या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्या.
Ambadas Danve-Uddhav Thackeray- Chandrashekhar Bawankule
Ambadas Danve-Uddhav Thackeray- Chandrashekhar BawankuleSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar, 12 May : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार शनिवारी (ता. 11 मे) थांबला. त्यानंतर महाराष्ट्रातील महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचे नेते सोशल मीडियावर एकमेकांवर तुटून पडले आहेत. विशेषतः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नकली संतान टीकेनंतर प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्याला भाजपकडून जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी स्पर्धा लागली आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीवरून भाजपने या दोघांना लक्ष्य केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाच प्रश्न विचारत डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पाच प्रश्न विचारत प्रत्युत्तर दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ambadas Danve-Uddhav Thackeray- Chandrashekhar Bawankule
Beed Lok Sabha : पंकजा मुंडेंसाठी मोदी, गडकरी, अजितदादांची बॅटिंग; पण फडणवीस बीडकडे फिरकलेच नाहीत!

तुम्हाला यंदाच्या निवडणुकीत जळी-स्थळी-पाषाणी केवळ ठाकरे दिसत आहेत, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला. बावनकुळे साहेब राज्यात तुमचे म्हणजेच भाजपचे सरकार आहे, दहा वर्षांपासून राज्य तुमचे आहे. उत्तर तर तुम्ही द्यायला हवी! हिंमत असेल तर या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्या! माणिपुरात माय-भगिनींची अब्रू लुटली जात असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे का फिरकले नाहीत? महाराष्ट्राचा शेतकरी टाहो फोडत असताना कांदा निर्यात आणि इथेनॉल निर्मितीवर जुलमी निर्बंध का लादले गेले?

शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे लडाखमध्ये सुरू असलेले आंदोलन का चिघळले, त्यांच्या मागण्यांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद का मिळत नाही. 66 दिवस आंदोलन करत होते. भाजपच्या एकही मंत्र्याला तिथे जाण्यासाठी वेळ का नाही मिळाला? सावरकरांचा सोयीस्कर असा राजकीय वापर करणे तुम्ही कधी बंद करणार आहात? 'भारत रत्न' त्यांना कधी देणार? यांसह युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करून ते न उभारता तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला 'उल्लू' बनवले आहे. कधी बांधत आहात स्मारक?, असे प्रश्न उपस्थितीत करत बावनकुळे यांची कोंडी केली.

तत्पुर्वी बावनकुळे यांनी `तू इधर उधर की न बात कर, ये बता काफिला कैसे लुटा?, मुझे रहज़नों से गिला तो है, पर तेरी रहबरी का सवाल है...अशा शायरान अंदाजात उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीची खिल्ली उडवली होती. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच असल्याची टीका करत उद्धव ठाकरे यांना पाच प्रश्न विचारले होते.

Ambadas Danve-Uddhav Thackeray- Chandrashekhar Bawankule
Lok Sabha Election 2024 : 'फोर्टी प्लस' ही घोषणा भाजपची की नाना पटोले यांची?

दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय? १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का? सत्तेवर आल्यास हिंदूची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे, त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात?

राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात, त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात? तसेच उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता ? या दोन्ही बाजूंच्या प्रश्न आणि आरोपांवरून राजकीय वातावरण तापले आहे.

Ambadas Danve-Uddhav Thackeray- Chandrashekhar Bawankule
Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदेंची अखेरची फडफड; लोकसभेनंतर त्यांचे राजकारण संपणार : शिवसेना नेत्याचे भाकीत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com