Sanjay Gaikwad : शिंदेंच्या आमदाराला 37 वर्षांनी आली जाग! 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाला घरात घुसून मारण्याची धमकी, पानसरेंचा उल्लेख करत म्हणाले...

Govind Pansare Book Controversy : आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. गायकवाड यांनी शिवाजी महाराजांचा अनादर केल्याचे म्हणत आंबी यांन शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
MLA Sanjay Gaikwad controversy
A still image capturing MLA Sanjay Gaikwad amid the growing controversy over Govind Pansare’s book, highlighting the viral threat audio row.Sarkarnama
Published on
Updated on

Govind Pansare Book Controversy : दिवंगत प्राध्यापक गोविंद पानसरे यांनी 37 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहलेल्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाच्या नावावर आक्षेप घेतला आहे.

संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. गायकवाड यांनी शिवाजी महाराजांचा अनादर केल्याचे म्हणत आंबी यांन शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय ही ऑडिओ क्लीप माझीच असल्याचं आमदार गायकवाड यांनी मान्य केलं आहे.

आमदार गायकवाड नेमकं काय म्हणाले?

या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार संजय गायकवाड म्हणतात की, "शिवाजी कोण होता? असा एकरी उल्लेख का केलाय तुम्ही शिवाजी महाराजांना एकेरी बोलता का? त्यावर प्रशांत आंबी म्हणतात की, "हे पुस्तक गोविंग पानसरे यांनी लिहिलं आहे."

नंतर गायकवाड म्हणतात : अरे तो कोण आहे? तुला माहितेय ना गोविंग पानसरेचे काय हाल केलेत.

प्रशांत आंबी : हो माहितेय मला.

गायकवाड : मग ब्राह्मण आहे का तू?

आंबी : मी ब्राह्मण नाही.

MLA Sanjay Gaikwad controversy
Sunetra Pawar : "अजितदादांच्या पश्चात पहिली निवडणूक, साहेबपण आले नाहीत?"; प्रश्न विचारताच सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी म्हणाल्या, "सगळ्याच बाजूंनी..."

गायकवाड : जास्त शहाणपणा करू नको मी आमदार संजय गायकवाड आहे. घरात घुसून मारेन साल्या.

आंबी : धमक्या देऊ नका.

गायकवाड : मी व्यवस्थीत बोलतोय तू लिहिलं कसं? तु राहतो कुठं?

आंबी : मी कोल्हापुरात राहतो.

गायकवाड : मी घरात घुसून मारेन. ते म्हणाले नाव आणि बदल तुझी भाषा बदलं, अशी धमकी गायकवाड यांनी दिली.

दरम्यान, प्रशांत आंबी यांनीही संजय गायकवाडांना 'तुम्ही उद्या माझी जीभ कापायला या', असं प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गायकवाड म्हणाले, ज्या पद्धतीने त्याने जी मुजोरी ठेवली मी त्याला विचारत असताना तो मला सारखा डिवचतं होता.

MLA Sanjay Gaikwad controversy
Nashik crime : महाराष्ट्र पुन्हा हादरला! 'दैवी शक्ती'च्या नावाखाली भोंदू बाबाने महिलेला थेट लॉजवर नेलं; आधी कुंडात अंघोळ, नंतर ओल्या वस्त्रानिशी...

म्हणून मी जीभ हासडायची भाषा केली आणि अशा लोकांना शंभर टक्के जीभ हासडायची भाषा केली पाहिजे. शिवाय अशा पुस्तकांमध्ये जी शिवरायांबद्दल एकेरी भाषा वापरली आहे ती आम्ही या महाराष्ट्रात नाही सहन करू शकत, असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com