Shivsena Vs BJP : दानवे खोतकरांच्या ग्वाहीनंतरही भडका? शिवसेना-भाजपचे नगरसेवक भिडले; तीव्र वाद अन् तणावपूर्ण वातावरण

Jalna Municipal Corporation Political Rada : जालना महापालिकेत राज्यातील सत्तेत सहभागी असणारे शिवसेना-भाजप एकमेकांचे पक्के वैरी झाले आहेत.
jalna municipal corporation meeting clash shivsena bjp corporators
jalna municipal corporation meeting clash shivsena bjp corporatorssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. जालना महापालिकेच्या सभेत शिवसेना व भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार वाद झाला

  2. दानवे आणि खोतकर यांच्या एकतेच्या वक्तव्यानंतरही राजकीय तणाव उघड झाला

  3. सभागृहात जवळपास अर्धा तास गोंधळाचे वातावरण निर्माण झाले

Jalna Political Rada News : 'आता आमच्यात भांडण नाही, मतभेद दूर झाले, मनभेद कधीच नव्हते', असे सांगत शहराचा विकास एकत्र साधू अशी ग्वाही भाजपचे नेते रावसाहेब दानवे, शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी नुकतीच दिली. मैत्रीचा दाखला देऊन चोवीस तास उलटत नाही तोच जालना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक कमलेश खरे आणि भाजपचे अक्षय गोरंट्याल यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

दोघेही आपापल्या जागेवरून एकमेकांकडे हात करून तावातावाने बोलत होते. वाद चिघळणार हे लक्षात येताच भाजपचे भास्कर दानवे, राऊत व इतर नगरसेवकांनी धाव घेत दोघांनाही शांत केले. दोन्ही पक्षाचे नगरसेवक एकमेकांकडे धावून आल्याने सभागृहातील वातावरण तापले होते. महापौर वारंवार सदस्यांना जागेवर बसा अशा सूचना देत होत्या. परंतु त्याकडे एकाही नगरसेवकाचे लक्ष नव्हते. सभागृहात अर्धा तास हा गोंधळ सुरू होता.

महापालिकेत भाजपची शतप्रतिशत सत्ता आहे. महापौर, उपमहापौर आणि सगळी महत्वाची पद भाजपाने आपल्याकडेच राखली आहे. निवडणुकीत युती न केल्यामुळे राज्यात मित्रपक्ष असलेला शिवसेना पक्षच महापालिकलेच्या सभागृहात भाजपचा प्रमुख विरोधक आहे. पाच वर्ष महापालिकेत कसा कारभार चालणार? याची झलक आजच्या सर्वसाधारण सभेतून दिसून आली.

jalna municipal corporation meeting clash shivsena bjp corporators
Shivsena Vs BJP : शिरसाट, सत्तार अन् भुमरेंनी मिळून घालवली शिवसेनेची सत्ता; संधी मिळताच डाव मारलेले 'अतुल सावे' मुख्यमंत्र्याच्या आणखी जवळ

शहरातील महात्मा फुले मार्केट उभारणी प्रश्नावर चर्चा सुरू असतानच नगरसेवक अक्षय गोरंट्याल आणि शिवसेनेचे विरोध पक्षनेते कमलेश खरे यांच्यातील यांच्यात खटका उडाला. वाद इतका विकोपाला गेला की उपमहापौर राजेश राऊत यांना आपल्या खुर्चीवरून खाली यावे लागले. पंधरा वर्षांपूर्वी शहरातील महात्मा फुले मार्केट पाडण्यात आले होते. या मार्केटच्या उभारणीसाठी राज्य शासन स्तरावर महापालिकेने काय पाठपुरावा केला? असा प्रश्न भाजपचे नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांनी केला.

त्यावर अधिकार्‍यांनी उत्तर दिल्यानंतर शिवसेनेचे गटनेते यांनी तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांच्या काळात घेतलेल्या ठरावानुसार महात्मा फुले मार्केटची उभारणी होणार की नवीन ठराव घेण्यात आला आहे? याची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणी केली. यावर भाजप आणि शिवसेना नगरसेवकांची जुंपली. तत्कालीन सत्ताधारी शिवसेनेच्या कार्यकाळात कोणत्या निकषानुसार महात्मा फुले मार्केट पाडण्यात आले? असा प्रश्न भाजपचे नगरसेवक महावीर ढक्का यांनी केला.

त्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. महात्मा फुले मार्केट धोकादायक झाले होते म्हणून पाडण्यात आल्याचा दावा शिवसेनेचे गटनेते दुर्गेश काठोठीवले यांनी केला. शिवाय पंधरा वर्षे तुमची सत्ता होती, तुम्ही का आतापर्यंत बांधलं नाही ? असा प्रश्नही उपस्थित केला? यामध्ये भाजपचे नगरसेवक अक्षय गोरंट्याल आणि शिवसेनेचे विरोधी पक्षनेते कमलेश खरे यांच्यातच जुंपली.

शा‍ब्दिक चकमक उडाल्यानंतर दोघे एकमेकांना खुन्नस देताना दिसले. प्रकरण अधिक चिघळू लागल्याने भाजपच्या सर्व नगरसेवकांनी मध्यस्थी केली. शिवाय उपमहापौर राजेश राऊत यांनी व्यासपीठ सोडून दोन्ही नगरसेवकांना शांत करून जागेवर बसवले. दरम्यान महापौर वंदना मगरे यांनी दोन्ही नगरसेवकांना जागेवर बसण्याच्या सूचना करत सभागृहाचे कामकाज नियमानुसार सुरू करण्याचे निर्देश दिले. जर काम असे चालणार असेल तर सभागृह तहकून केले जाईल, अशी तंबी महापौरांनी दिल्यानंतर हा वाद मिटला.

आयुक्त निघून गेले...

महापालिकेच्या आयुक्तपदी अंजली शर्मा यांनी सोमवारी पदवार घेतला. पदभार घेतल्यानंतर पहिल्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचा गोंधळ पाहिल्यानंतर त्यांनी महापौर वंदना मगरे यांची परवानगी घेऊन महत्त्वाची मीटिंग असल्याचे सांगून सभागृह सोडले.

jalna municipal corporation meeting clash shivsena bjp corporators
Shiv Sena symbol dispute Supreme Court: शिवसेना-राष्ट्रवादीच्या अंतिम सुनावणीला तब्बल 4 महिन्यांनंतर मिळाला मुहूर्त : साडे तीन वर्षांच्या संघर्षाचा शेवट होणार?

FAQs :

1. ही घटना कुठे घडली?
ही घटना जालना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घडली

2. कोणत्या पक्षांमध्ये वाद झाला?
शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये वाद झाला

3. वादाचे कारण काय होते?
सभेदरम्यान काही मुद्द्यांवरून दोन्ही पक्षांमध्ये तीव्र मतभेद झाले

4. वाद किती वेळ चालला?
सभागृहात सुमारे अर्धा तास गोंधळ सुरू होता

5. परिस्थिती कशी नियंत्रणात आली?
इतर नगरसेवकांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंना शांत केले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com