CJP News : संगणक अभियंत्याची नोकरी सोडली, आता आंदोलनाची धुरा खांद्यावर; औशाचा अजिंक्य शिंदे दिल्लीच्या राजकारणात चर्चेत!

Cockroach Janata Party protest latest updates : अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेले शिंदे आता नव्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आले आहेत.
Abhihjeet dipke, ajinkya shinde
Abhihjeet dipke, ajinkya shinde Sarkarnama
Published on: 
Updated on: 

जलील पठाण

Delhi Protest : संगणक अभियंत्याची सुरक्षित नोकरी सोडून आंदोलनाच्या वाटेवर आलेला औसा तालुक्यातील उजनी गावचा तरुण आता दिल्लीतील राजकीय घडामोडींमुळे चर्चेत आला आहे. सीजेपीचे अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी आशुतोष व सौरभ दास यांना दिल्ली विमानतळावर अटक झाल्यानंतर संघटनेच्या पुढील आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपविण्याची घोषणा केली.

अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून प्रेरणा घेत समाजकारणात उतरलेले आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेले शिंदे आता नव्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आले आहेत. अजिंक्य शिंदे यांचे मूळ गाव औसा तालुक्यातील उजनी. त्यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक असून, सध्या कोकणात शेती करतात.

अजिंक्य यांनी संगणक अभियंता म्हणून व्यावसायिक कारकीर्द सुरू केली होती. मात्र, देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीने त्यांना अस्वस्थ केले. लोकपालच्या मागणीसाठी अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या आंदोलनाने त्यांच्या विचारांना दिशा दिली. केवळ व्यवस्थेवर टीका करण्यापेक्षा बदलाच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचे, या भूमिकेतून त्यांनी नोकरी सोडली आणि समाजकारणाचा मार्ग स्वीकारला.

Abhihjeet dipke, ajinkya shinde
India Alliance Protest: तीन दिवसांच्या आंदोलनानंतर राहुल गांधींनी शिष्टमंडळासह गाठलं राष्ट्रपती भवन; द्रौपदी मुर्मूंच्या भेटीनंतर महत्वाचा दावा

केजरीवालांच्या पक्षात प्रदेशाध्यक्ष ते गोव्याचे प्रभारी

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अजिंक्य शिंदे यांनी आम आदमी पक्षात सक्रिय सहभाग घेतला. महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर गोव्याचे प्रभारी म्हणूनही पक्षाची जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्राच्या राजकारणापासून गोव्याच्या संघटनात्मक कामापर्यंतचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी आम आदमी (AAP) पक्षाला सोडचिठ्ठी देत सीजेपीमध्ये प्रवेश केला. पक्ष बदलला, व्यासपीठ बदलले; मात्र आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची भूमिका त्यांच्या प्रवासाचा केंद्रबिंदू राहिली.

Abhihjeet dipke, ajinkya shinde
Rahul Gandhi SIR Protest : उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जींना राहुल गांधींचा फोन; मोदी सरकारविरोधात रणनीती ठरली!

दिल्लीतील आंदोलनाच्या पडद्यामागचा सूत्रधार?

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dhrmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनाच्या नियोजनात अजिंक्य शिंदे यांच्यावर प्रमुख जबाबदारी होती, अशी माहिती आहे. आंदोलनाची आखणी आणि पडद्यामागील समन्वय साधण्यात त्यांनी भूमिका बजावली. त्यामुळे केवळ आंदोलनात सहभागी होणारा कार्यकर्ता एवढीच त्यांची ओळख नसून, आंदोलनाची रणनीती ठरविणाऱ्या फळीतील त्यांचा सहभागही महत्त्वाचा मानला जात आहे.

अटकेनंतर नेतृत्वाची नवी जबाबदारी

सीजेपीचे अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्ली विमानतळावर अटक झाल्याच्या घटनेनंतर संघटनेच्या पुढील आंदोलनाची जबाबदारी अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपविण्याची घोषणा झाली. या घोषणेमुळे दिल्लीतील आंदोलनाच्या राजकारणात औसा तालुक्यातील उजनी गावचे नाव चर्चेत आले आहे. ग्रामीण भागातून पुढे आलेल्या आणि अभियंत्याची नोकरी सोडून सामाजिक-राजकीय क्षेत्रात उतरलेल्या या तरुणापुढे आता संघटनेची भूमिका पुढे नेण्याचे आव्हान आहे.

Abhihjeet dipke, ajinkya shinde
INDIA Alliance : मुख्यमंत्र्याची पक्षासह इंडिया आघाडीत एन्ट्री, अधिकृत भूमिका जाहीर

उजनीच्या मातीतून दिल्लीच्या आंदोलनाच्या वर्तुळापर्यंत पोहोचलेला अजिंक्य शिंदे यांचा प्रवास लक्षवेधी आहे. मात्र, पुढील आंदोलनाची दिशा, संघटनेची रणनीती आणि सरकारविरोधातील भूमिका ते कशा पद्धतीने पुढे नेतात, यावर त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com