Shivsena Rajya Sabha election : राज्यसभेसाठी इच्छुकांची रस्सीखेच; उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय; नवीन चेहरा की अनुभवाला प्राधान्य?

MVA lone seat battle News : महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यांच्या वाट्याला फक्त एक जागा येणार आहे. त्यामुळे या तीनही पक्षांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati sambhajinagar News : महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून देण्यासाठीच्या सात जागांसाठी महायुती-महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा आहे. खासदारांच्या संख्येनुसार प्रत्येक पक्षाला संधी मिळणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यांच्या वाट्याला फक्त एक जागा येणार आहे. त्यामुळे या तीनही पक्षांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे राज्यसभेची एकमेव जागा आपल्याकडे राखण्याच्या प्रयत्नात आहेत. अर्थात शरद पवारांनी राज्यसभेवर जाण्यास नकार दिला तर त्यांचा दावा प्रबळ राहणार आहे.

आदित्य ठाकरे हे प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावासाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यसभेवर संधी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाचे दुसरे नेते आणि माजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही राज्यसभेवर जाण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केल्याची माहिती आहे. एका जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच असल्यामुळे नेमकी कोणाला संधी मिळते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray
BJP News : अतिश दांडेगांवकरांचा भाजपात प्रवेश होताच प्रदेशाध्यक्षांनी दिला 'हा' शब्द

या संदर्भात चंद्रकांत खैरे यांच्याशी संपर्क साधला असता आपण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे राज्यसभेवर संधी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केल्याचे 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. परंतु महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा येणार असल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार काय निर्णय घेतात? यावर सगळं अवलंबून आहे. पवार साहेब राज्यसभेवर जाण्यास तयार झाले तर मात्र आमच्या इच्छेला अर्थ उरत नाही. ते मोठे नेते आहेत, त्यांच्यासाठी आम्हाला माघार घ्यावी लागेल, असेही खैरे यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray
Bjp Vs Shivsena : युती झाली, पण वर्चस्वाची लढाई पेटली! शिंदे सेनेच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत, भाजपचा अध्यक्षपदावरही डोळा

दुसरीकडे विधान परिषदेची मुदत संपलेले शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुसरे नेते अंबादास दानवे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असलेल्या दानवे यांना राज्यसभेवर संधी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. दानवे यांनीही तशी इच्छा पक्षप्रमुखांकडे व्यक्त केल्याची चर्चा आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्यासाठी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात स्पर्धा आहे.

शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष..

महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठवण्याची चर्चा आहे. काँग्रेस-शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये सध्या यावर खल सुरू आहे. वाढते वय आणि प्रकृतीच्या कारणाने शरद पवार हे राज्यसभेवर जाणार नाहीत, असेही बोलले जाते.

Uddhav Thackeray
NCP-BJP Politics : शिंदेंना शह! गोगावलेंचा गेम, सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेना सत्तेबाहेर; भाजप-राष्ट्रवादी सत्ता येणार? तटकरेंचा डाव

या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या जागेवर दावा सांगण्याची शक्यता अधिक आहे. या पक्षाकडून प्रियंका चतुर्वेदी यांचे नाव आघाडीवर असले तरी मराठी विरुद्ध हिंदी अशा तापलेल्या राजकीय वातावरणात उद्धव ठाकरे मराठी चेहरा राज्यसभेसाठी देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. दोन वेळा आमदार, चार वेळा खासदार राहिलेले खैरे हे पक्ष फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले.

Uddhav Thackeray
congress Vs bjp :'भाजपची शेवटची फडफड, त्यांचा शेवट जवळ आलाय'; काँग्रेस उपमुख्यमंत्र्याची जळजळीत टीका

2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांना छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून महायुतीने उमेदवारीची आॅफर दिली होती. परंतु त्यांनी ती नाकारत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडूनच लढण्याचा निर्णय घेतला. ते पराभूत झाले असले तरी पक्षात सक्रीय आहेत. तर अंबादास दानवे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून आपला कार्यकाळ चांगलाच गाजवला. उद्धव ठाकरे यांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या दानवे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची संधी या निमित्ताने आहे. अशावेळी राज्यसभेवर त्यांना पाठवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

चंद्रकांत खैरे यांना लोकसभेची उमेदवारी दिली तेव्हाही अंबादास दानवे यांनी संभाजीनगरमधून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे दिल्लीतल्या राजकारणात जाण्याची त्यांची ही सुप्त इच्छा राज्यसभेच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. परंतु महाविकास आघाडीतील स्पर्धेत ते कितपत शक्य होईल, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

Uddhav Thackeray
Shivsena RajyaSabha : राज्यसभेसाठी राहुल शेवाळेंचा पत्ता कट, नीलमताईंचाही नकार : एकनाथ शिंदे आता भाजपच्या ताकदीला थोपणाऱ्या चेहऱ्याच्या शोधात?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com