Nanded Crime : खरात प्रकरण धुमसत असतानाच नांदेडमध्ये भोंदूबाबाच्या समर्थकांचा राडा; पोलीस ठाण्यातच उपनिरीक्षकाची कॉलर पकडली, दिली जीवे मारण्याची धमकी

Nanded Talwar Baba arrest Case: नाशिकमधील अशोक खरात या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असतानाच आता नांदेडमध्ये ‘तलवार बाबा’चे पितळ उघडे पडले आहे.
Nanded crime news baba supporters threaten police officer
Nanded crime news baba supporters threaten police officersarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. नांदेडच्या बिलोलीमध्ये तलवार बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानेश्वर करडे याला अटक करण्यात आली.

  2. अटकेनंतर समर्थकांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घालत कागदपत्रे फाडली.

  3. पोलिसांनी बाबासह दोन समर्थकांनाही अटक करून कारवाई केली आहे.

Nanded Crime News : नाशिकमधील अशोक खरात प्रकरण चांगले तापले असून यामुळे राजकीय वादळ उठले आहे. एकीकडे रूपाली चाकणकर यांना आपल्या पदावरून पाय उतार व्हावं लागलं असून त्यांची चौकशी होणार आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन नेत्यांना देखील आता या प्रकरणात स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे. अशातच नवी मुंबईतही भोंदूबाबाचे प्रकरण नुकताच उघड झाले असून अनेक महिलांचा छळ त्याने केल्याचे उघड झाले आहे.

राज्यभर अशी प्रकरणे समोर येत असतानाच नांदेडमध्ये देखील अशा एका भोंदूबाबाचे पितळ उघडे पडले आहे. येथील ‘तलवार बाबा’ला पोलिसांनी अटक केली. ज्यानंतर त्याच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. तसेच फिर्यादीची प्रत फाडत उपनिरीक्षकाची कॉलर पकडली. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. आता या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून कायद्याचा धाग राहिलेला नाही अशीच कुजबूज सुरू झाली आहे.

नाशिकमधील अशोक खरात या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून रूपाली चाकणकर यांना आपल्या पदावरून पाय उतार व्हावं लागलं असतानाच शिंदेंच्या शिवसेनेचे माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर अडचणीत आले आहेत.

तसेच आता भोंदूबाबा खरातला नीलम गोऱ्हे तीनदा भेटल्याचा दावा तृप्ती देसाईंनी केला आहे. या दाव्यामुळे या प्रकरणाला नवं राजकीय वळण मिळालं आहे. यातच आता खरातच्या मुलीच्या लग्नाची पत्रिकाही समोर आली असून यात राज्यातील मोठे राजकीय नेत्यांची नावे समोर आली आहेत. यामुळे आता राज्यभरात खळबळ उडालेली आहे.

Nanded crime news baba supporters threaten police officer
Ashok Kharat Case: खरातच्या ऑफिसमधून SIT नं महत्वाचे पुरावे केले जप्त; पीडित महिलांना घटनास्थळी...

अशातच आता नाशिक नवी मुंबई, पुण्यानंतर नांदेडमध्येही भोंदूबाबाचे पितळ उघडे पडले आहे. याप्रकरणी नांदेडसह राज्यभर संतापाची लाट उठताना दिसत आहे. बडूर (ता. बिलोली) येथील ‘तलवार बाबा’ विरूद्ध पोलिसांत गुन्हा नोंद झाला. पोलिस कर्मचारी माधव तोटेवाड यांनी ‘तलवार बाबा’ विरोधात फिर्याद दिली. ज्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

पण अटकेची बातमी पसरताच त्याच्या काही समर्थकांनी रविवारी (ता. २९) रात्री येथील पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. जोरदार राडा करत पोलिस ठाण्यात दिलेली फिर्यादीची प्रत फाडली. फक्त फिर्यादीची प्रत फाडली नाही तर थेट उपनिरीक्षक शिवराज लोखंडे यांची कॉलर पकडली.

तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर यांनी दिली आहे.

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, बडूर येथील ज्ञानेश्वर करडे उर्फ भोंदू ‘तलवार बाबा’ याच्याकडून समाजात अंधश्रद्धा पसरवली जात आहे. त्याच्याकडून ग्रामीण भागातील अशिक्षितांची फसवणूक, मानसिक, आर्थिक शोषण केलं जातेय. या प्रकरणी पोलिस कर्मचारी माधव तोटेवाड यांनी फिर्याद दिली होती. तर रविवारी (ता. २९) याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबातची माहिती मिळताच काही समर्थक रात्री येथील पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पोलिस ठाण्यात दिलेली फिर्यादीची प्रत फाडत उपनिरीक्षक शिवराज लोखंडे यांची कॉलर पकडून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर, उपनिरीक्षक अतुल भोसले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत लोखंडे यांना गराड्यातून बाहेर काढले.

या प्रकरणी आता पोलिसांनी बाबाच्या दोन समर्थकांना देखील अटक केली आहे. तर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवकांत शिवराम मैलारे (वय ३५) आणि नबाजी बाबा वाघेकर (वय ३४, दोघे रा. गांधीचौक, बिलोली) अशी अटक करण्यात आलेल्या ‘बाबा’च्या हितचिंतकांची नावे आहेत.

तर या तिघांवर शासकीय कामात अडथळा, अधिकाऱ्यांना धमकावणे, जीवे मारण्याची धमकी देणे आदी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आता हा भोंदूबाबा हाथात तलवार घेऊन लोकांची फसवणूक करत होता, असा आरोप होत आहे. तर त्याच्यासह आणखी दोघांना अटक झाल्याने तर एकावर गुन्हा झाला असून त्याच्या समर्थकांनी दादागिरी केल्याने नांदेडसह राज्यात खळबळ उडाली आहे.

Nanded crime news baba supporters threaten police officer
Ashok Kharat case full story : दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या भोंदू खरातचा 'काळा अध्याय' अखेर संपला! 10 दिवसांत नेमकं काय काय घडलं?

FAQs :

1. तलवार बाबा कोण आहे?
ज्ञानेश्वर करडे हा तलवार बाबा म्हणून ओळखला जाणारा भोंदूबाबा आहे.

2. त्याला का अटक करण्यात आली?
लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून त्याला अटक झाली.

3. पोलिस ठाण्यात काय घडलं?
त्याच्या समर्थकांनी गोंधळ घालत कागदपत्रे फाडली आणि धमक्या दिल्या.

4. किती जणांना अटक झाली?
बाबासह दोन समर्थकांना अटक करण्यात आली आहे.

5. पुढील कारवाई काय होणार?
पोलिस तपास सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com