Parbhani Hingoli election : उमेदवारीला विरोध होताच, बजोरिया प्रकटले; मुलगा विप्लवने आमदारकीच्या काळात 130 कोटींची कामे केल्याचा दावा!

MLC Election News : विप्लव बजोरिया आणि गोपीकिशन बजोरिया हे विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर सहा वर्षात मतदारसंघात फारसे फिरकलेच नाहीत, असा आरोप केवळ विरोधकच नाही तर महायुतीतील नेत्यांनीही केला आहे.

vipalv Bajoriya, gopikishan Bajoriya
vipalv Bajoriya, gopikishan BajoriyaSarkarnama
Published on
Updated on

Parbhani-Hingoli MLC Election : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत 2018 मध्ये विदर्भातून येऊन चमत्कार घडवणारे बजोरिया पिता-पूत्र सध्या अडचणीत सापडले आहेत. विप्लव बजोरिया आणि गोपीकिशन बजोरिया हे विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर सहा वर्षात मतदारसंघात फारसे फिरकलेच नाहीत, असा आरोप केवळ विरोधकच नाही तर महायुतीतील नेत्यांनीही केला आहे.

शिवसेनेचे मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विप्लव बजोरिया यांना दुसऱ्यांदा उमेदवारीचा शब्द देत कामाला लागा, असे आदेश दिल्याचे बोलले जाते. असे असताना परभणी-हिंगोलीतून महायुतीकडूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध सुरू झाला आहे. अगदी शेजारच्या जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.


vipalv Bajoriya, gopikishan Bajoriya
MLC Election : निवडून येताच 'अदृश्य' होणाऱ्या विप्लव बजोरियांना महायुतीतूनच विरोध : विधानपरिषदेत अर्जुन खोतकरांच्या पुत्राची एन्ट्री होणार?

राष्ट्रवादीकडूनही (NCP) विप्लव बजोरिया यांना विरोध म्हणून जागा सुटली नाही तर खोतकरांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवल्याचे सांगितले जाते. अशावेळी आमदारकीची पुन्हा आलेली संधी हातून जाते की काय? या भितीपोटी विप्लव यांचे पिताश्री गोपीकिशन बजोरिया मुलाच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. बाहेरचा उमेदवार, आमदार सहा वर्षात मतदारसंघात फिरकले नाहीत, कामे केली नाही या सगळ्या आरोपांना त्यांनी उत्तरे दिली.


vipalv Bajoriya, gopikishan Bajoriya
BJP News : विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच परभणी-हिंगोलीवर भाजपचा दावा, जिल्हाध्यक्ष भुमरे म्हणतात, आमच्याकडे दीडशेवर मतदान!

एवढेच नाही तर सहा वर्षात विप्लव बजोरिया यांनी परभणी-हिंगोली मतदारसंघात 130 कोटींची विकासकामे केल्याचा दावा केला आहे. आम्ही गाजावाजा करणारे नाहीत तर काम करणारे लोक आहोत, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले. आमच्या काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आम्ही उद्घाटनाचा गाजावाजा, राजकारण करत नाही. काम करतो आणि पुढे जातो.


vipalv Bajoriya, gopikishan Bajoriya
Parbhani Hingoli MLC: राष्ट्रवादीला डच्चू देण्यासाठी भाजपचे स्थानिक नेते एकवटले; मेघना बोर्डीकर पाच इच्छुकांसह 'देवाभाऊं' च्या दरबारी

नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य हेच आमचे मतदार आहेत आणि त्यांच्याशी आमचा कायम संपर्क असतो, असा दावाही गोपीकिशन बजोरिया यांनी केला. विशेष म्हणजे आमदार विप्लव बजोरिया आपली बाजू मांडण्यासाठी पुढे का आले नाहीत? या प्रश्नावर ते सध्या परभणी दौऱ्यावर आहेत, लवकरच हिंगोलीत येतील, असे उत्तर गोपीकिशन बजोरिया यांनी माध्यमांना दिले.


vipalv Bajoriya, gopikishan Bajoriya
Arjun Khotkar: अर्जुन खोतकर मुलाच्या पाठिंब्यासाठी सुनेत्रा पवारांना भेटले, जालन्यातून भास्कर आंबेकरांसाठीही घातली गळ!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com