Osmanabad Assembly 2024 Result : धाराशिव- कळंबमध्ये कैलास पाटील यांना निष्ठेचे फळ मिळाले; मुख्यमंत्री शिंदेंचा डाव फसला

Assembly 2024 Result : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतेला निघालेले आमदार कैलास पाटील अर्ध्या वाटेतून परत फिरले आणि त्याचे फळ त्यांनी धाराशिव-कळंब मतदारसंघातून विजयाच्या रूपाने मिळाले आहे.
Kailas Patil, Ajit Pingle
Kailas Patil, Ajit Pingle Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतेला निघालेले आमदार कैलास पाटील अर्ध्या वाटेतून परत फिरले आणि त्याचे फळ त्यांनी धाराशिव-कळंब मतदारसंघातून विजयाच्या रूपाने मिळाले आहे. पाटील यांच्यासमोर शिवसेनेचाच उमेदवार देण्याचा हट्ट मुख्यमंत्री शिंदे यांनी पूर्ण केला, मात्र उमेदवार भाजपमधून आयात करावा लागला, याचा फटका बसला आणि अजित पिंगळे 36 हजार 566 पराभूत झाले.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदाराला सुरतेला निघाले होते. तेथून ते पुढे गुवाहाटीला जाणार होते. या 40 आमदारांमध्ये धाराशिवचे कैलास पाटील हेही होते. सुरतेला पोहोचण्यापूर्वीच स्वतःची सुटका करून घेऊन मिळेल ते वाहन पकडून ते मुंबईला परत आले होते. धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी त्यावेळी सांगितलेली स्वतःची ही कहाणी प्रचंड व्हायरल झाली होती. त्या निष्ठेचे फळ कैलास पाटील (Kailas Patil ) यांना मिळाले आहे. त्यांनी शिवसेनेचे अजित पिंगळे यांचा 36 हजार 566 मतांनी पराभव केला.

Kailas Patil, Ajit Pingle
Umarga-Lohara Assembly Election : ज्ञानराज चौगुले आमचे ओपनिंग बॅट्समन : श्रीकांत शिंदे

धाराशिव मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांनी दावा केला होता. अखेर हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला. शिवसेनेकडून (Shivsena) जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे यांच्यासह सुधीर पाटील, शिवाजी कापसे इच्छुक होते. निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करून, उमेदवारीचे आश्वासन देऊन पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी कापसे यांना आपल्या पक्षात ओढले होते. मात्र ते शिवाजी कापसे यांना उमेदवारी देऊ शकले नाहीत. सुधीर पाटील यांनीही काही महिन्यांपूर्वीच भाजपमधून शिवसेनेच प्रवेश केला होता, तो उमेदवारी मिळवण्यासाठीच. त्यांचाही भ्रमनिरास झाला.

Kailas Patil, Ajit Pingle
Hingoli Assembly 2024 Result : हिंगोलीतील चुरशीच्या लढतीत भाजपच्या मुटकुळेंची हॅट्ट्रिक

धाराशिव-कळंब मतदारसंघातून पक्षाला सक्षम उमेदवार मिळाला नाही, असा संदेश खुद्द शिवसेनेनच दिला तो भाजपमधून उमेदवार आयात करून. भाजपचे कळंब तालुकाप्रमुख अजित पिंगळे यांनी उमेदवारी मिळायच्या काही दिवस आधीच शिवसेनेत प्रवेश केला होता. तसे ते मूळचे शिवसैनिकच. 2019 मध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावरही समाजमाध्यमांतून सातत्याने निशाणा साधला होता. भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजतिसिंह पाटील यांचे ते निकटवर्तीय बनले. त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात पाटील यांच्यासह धाराशिवचे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचाही मोठा वाटा राहिला.

Kailas Patil, Ajit Pingle
Abdul Sattar : मुख्यमंत्री बदलण्याची ताकद माझ्यात; 'या' किरकोळ व्यक्ती माझं काय करणार? सत्तारांचा दानवेंवर निशाणा

लोकसभा निवडणुकीत धाराशिव-कळंब मतदारसंघाने महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना 60 हजारांचे मताधिक्य दिले होते. त्यामुळे कैलास पाटील यांचा मार्ग एका अर्थाने सुकर झाला होता. उमेदवारीही त्यांनाच मिळणार हे निश्चित होते. त्यामुळे त्यांनी आधीच तयारी सुरू केली होती. या मतदारसंघातील सर्वात महत्वाचा प्रश्न होता तो धाराशिव शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा. त्याचा फटका पाटील यांना बसणार, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र अजित पिंगळे हे कळंबचे रहिवासी आहेत. धाराशिवचा उमेदवार समोर असता तर पाटील यांना निवडणूक जड गेली असते, असे जाणकारांचे निरीक्षण होते.

Kailas Patil, Ajit Pingle
Ajit Pawar : निकालानंतर अजित पवारांची मोठी कबुली; म्हणाले, 'लाडकी बहीण योजनाच ठरली गेमचेंजर'

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर हे तुळजापूर मतदारसंघातून इच्छुक होते. हा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्यामुळे नाराज झालेल्या राजेनिंबाळकर यांनी धाराशिव-कळंबमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आमदार पाटील यांची डोकेदुखी वाढली होती. राजेनिंबाळकर यांनी माघार घेतली आणि पाटील यांच्या अडचणी कमी झाल्या. प्रचार भरात असतानाच कळंब येथील शिवसेनेचे काही नेते, पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. याचाही फायदा आमदार पाटील यांना झाला.

Kailas Patil, Ajit Pingle
Ajit Pawar News : निकालानंतर अजितदादांकडून 'तो' फोटो शेअर

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके, सुधीर पाटील आणि शिवाजी कापसे यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. तिघांनीही माघार घेतली, मात्र उमेदवार आयात केल्याने शिवसेनेत नाराजी असल्याचा संदेश गेला होता. त्याचा फटका अजित पिंगळे यांना बसल्याचे दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार दयानंद गायकवाड हे आमदार पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले होते. गायकवाड यांची वक्तृत्वशैली प्रभावी आहे. त्यांनी एका सभेत केलेली टीका पिंगळे यांच्या जिव्हारी लागली. त्या टीकेचा प्रतिवाद करण्यातच पिंगळे यांच्या यंत्रणेला काही दिवस खर्ची घालावे लागले.

Kailas Patil, Ajit Pingle
Maharashtra Election Result : उद्धव ठाकरे महायुतीत आले तर स्वागत करू..., निकालाचं चित्र स्पष्ट होण्याआधीच चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

कळंब तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. लढत दोन्ही शिवसेनेतेच झाली. हा बालेकिल्ला कोणत्या शिवसेनेच्या बाजूने राहतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. निकाल लागला आणि हा बालेकिल्ला उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभा राहिल्याचे स्पष्ट झाले. मतदारसंघ सोडवून तर घेतला, पण आपल्या पक्षाचा उमेदवार देता आला नाही, याचाही दुष्परिणाम मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाला भोगावा लागला. मतदारसंघात लक्षणीय अशी विकासकामे केलेली नसतानाही आमदार पाटील यांची नाव निष्ठेच्या बळावर पैलतीरी पोहोचली. (Edited By : Sachin Waghamre )

Kailas Patil, Ajit Pingle
Maharashtra Assembly Result 2024 : महाविकास आघाडीचा धुव्वा, महायुती सर्व जागांवर आघाडी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com