Dharashiv ZP election : धाराशिव झेडपी अध्यक्षाचा तिढा मुंबई दरबारी; तानाजी सावंतांशिवाय भाजपकडे मॅजिक फिगर, भूमिकेकडे लक्ष

Mahayuti victory Dharashiv News : भाजपने उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, तानाजी सावंत यांच्या गटाचे सदस्य दूर ठेवून त्यांच्याशिवाय 30 सदस्यांचा एकत्रित गट घेऊन मंगळवारपासून मुंबईत ठाण मांडून बसले आहेत.
Tanaji Sawant, om rajenimabalkar, ranajagjitsinh pati
Tanaji Sawant, om rajenimabalkar, ranajagjitsinh patil Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : धाराशिव जिल्हा परिषदेची निवडणूक चुरशीने पार पडली. सोमवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. 55 सदस्य संख्या असलेल्या धाराशिव जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 28 सदस्यांची गरज असताना महायुतीचे 40 सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे याठिकाणी महायुतीची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, महायुतीमध्ये भूम-परंडा-वाशी तालुक्यात तानाजी सावंत स्वतंत्र लढले आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी उत्सुकता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपसोबत जाणार का? याविषयी एकीकडे उलटसुलट चर्चा असुर असताना भाजपने उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, तानाजी सावंत यांच्या गटाचे सदस्य दूर ठेवून त्यांच्याशिवाय 30 सदस्यांचा एकत्रित गट घेऊन मंगळवारपासून मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. त्याठिकाणी या तिढ्यावर मार्ग काढला जाणार असून सीएम देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होकार मिळताच सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी महायुतीच्या पदरात मोठे यश टाकले आहे. कुठल्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. येथील निकालानंतर भाजप तसेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून येत्या काळात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचा होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी झालेल्या घडामोडीमुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अध्यक्ष पदावर दावा केला असल्याने आता घडामोडींना वेग आला आहे.

Tanaji Sawant, om rajenimabalkar, ranajagjitsinh pati
Pune BJP : पुण्याच्या राजकारणातील मोठी घडामोड, भाजपचा बंडखोरांना हिसका; 69 जणांचे निलंबन, संपूर्ण यादीच वाचा!

त्यामुळे आता बहुमताची मॅजिक फिगर कोण गाठणार याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच भाजप (BJP) वगळून सत्ता स्थापन करणे कठीण जाणार आहे. तर भाजपने एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोबत आली नाहीतरी मॅजिक फिगर तयार ठेवली असून 30 सदस्य सोबत घेऊनच नेतेमंडळी मुंबईत असल्याचे समजते.

Tanaji Sawant, om rajenimabalkar, ranajagjitsinh pati
Nashik Shivsean News : त्र्यंबकेश्वरमध्ये दादा भुसे-संजय राऊत आले समोरासमोर; पण एकमेकांकडे पाहिलेसुद्धा नाही

महायुतीतील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस मिळून 40 उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये भाजप 19 सदस्य निवडून आले आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या सेनेकडे 15 सदस्य आहेत. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 6 सदस्य आहेत. हे तिन्ही पक्ष एकत्र राहिल्यास सत्तास्थापन करण्यास कोणतीही अडचण नाही.

Tanaji Sawant, om rajenimabalkar, ranajagjitsinh pati
Shivsena Vs Ncp : ‘जिंकूनही हरली’ शिवसेना! रायगडात गोगावलेंनी पत्ते उघडताच तटकरेंनी डाव साधला

दुसरीकडे ऐन निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेतील तानाजी सावंत यांच्या गटाने सत्तेसाठी भाजप वगळून प्रयत्न झाल्यास त्याचा फटका शिंदेसेनेलाच बसू शकतो. आजघडीला भाजपकडे मॅजिक फिगर आहे. शिंदे यांची शिवसेना वगळूनही भाजप आपला अध्यक्ष निवडून आणू शकतो, अशी स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे शिंदे यांची शिवसेना अध्यक्षपदासाठी वेगळ्या वाटेने जाण्याची शक्यता दिसत नाही.

Tanaji Sawant, om rajenimabalkar, ranajagjitsinh pati
Pune Congress : ज्या जिल्हा परिषदेत 38 वर्ष सत्तेत तिथेच काँग्रेसचं पानिपत : एकही जागा जिंकता आली नाही!

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी 28 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने मॅजिक फिगर गाठण्यासाठी दुसऱ्या पक्षांना सोबत घ्यावे लागणार आहे. जिल्हा परिषदेत बहुमताची मॅजिक फिगर भाजप कशी गाठणार याची उत्सुकता आहे. संपूर्ण शिंदेसेना बाजुला ठेऊनही भाजप मॅजिक फिगर गाठू शकते. भाजपचे 19 सदस्य व तुरोरीतील निवडून आलेले बंडखोर सदस्य मिळन 20 फिगर होते. तर राष्ठ्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे 6 तर 1 पुरस्कृत असे 27 तर समाजवादी पक्षाचा एक असे 28 मॅजिक भाजपसाठी फारसे कठीण नाही.

Tanaji Sawant, om rajenimabalkar, ranajagjitsinh pati
BJP-Shivsena Alliance : चंद्रपूरमधील भाजपसोबतच्या युतीला उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद; गोंधळाने केला काँग्रेसचा घात : संदीप गिऱ्हेंना क्लिनचीट

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भाजपला बाहेर ठेवण्याचे प्रयत्न तूर्त दिसत नाहीत. तसे प्रयत्न झालेच तर त्याच्याच पक्षात फाटाफूट होऊ शकते. शिंदेसेनेचे काही सदस्य हे मूळ भाजपचे आहेत. त्यामधील काही जणांनी निवडून आल्यानंतर शिंगोलीचा बंगला गाठला होता. शिवाय, काही मूळ शिंदेसेना सदस्यही भाजपसोबत आहेत. त्यामुळे ही फाटाफूट टाळणे शिंदे शिवसेनेला अवघड जाणार आहे.

Tanaji Sawant, om rajenimabalkar, ranajagjitsinh pati
Shivsena Vs Ncp : ‘जिंकूनही हरली’ शिवसेना! रायगडात गोगावलेंनी पत्ते उघडताच तटकरेंनी डाव साधला

भाजप शिंदे सेनेचे सदस्य सहलीवर

कोणताही दगाफटका होऊ नये, मिरवणुका, हार-तुर आटोपून भाजपचे बहुतांश सदस्य सोमवारी रात्रीच सहलीवर रवाना झाले. त्यांच्यासमवेत शिंदेसेनेतील काही सदस्यही या सहलीत सहभागी झाले आहेत. भाजपने ३० सदस्य सुरक्षेत सुरक्षित स्थळी रवाना झाले आहेत.

Tanaji Sawant, om rajenimabalkar, ranajagjitsinh pati
Congress Politics : महापालिका, ZP च्या धामधुमीतच काँग्रेसचा महाराष्ट्रात नवा प्रयोग; सलगच्या पराभवांची मरगळ झटकून सुरु केली 2029 ची तयारी

दोन्ही शिवसेना एकत्र येणार का ?

सध्या शिंदे यांच्या शिवसेनेकडे त्यांचे 15 व त्यांच्याच पक्षाचा 1 अपक्ष आहे. उद्धवसेना व काँग्रेसचे 10 सदस्यांना सोबत घ्यावे लागल्यानंतर त्यांच्याकडे 26 सदस्य होत आहेत. उद्धवसेना सोबत आलीच तर त्यांचा 1 पुरस्कृत अपक्ष सदस्यही आहे. त्यासोबतच समाजवादी पार्टीशी हातमिळवणी केल्यानंतर त्या फिगरपर्यंत शिंदेसेनेला पोहोचता येऊ शकते. राजकारणात काहीही घडू शकते. मात्र, तुर्तास ही शक्यता दिसत नाही.

Tanaji Sawant, om rajenimabalkar, ranajagjitsinh pati
ShivsenaUBT Vs BJP : मोदी-ठाकरे नावांवरून रणांगण पेटलं! ‘चोर है’च्या घोषणा; भाजप-ठाकरसेना नगरसेवक आमने-सामने

त्यातच आता भाजपने उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, तानाजी सावंत यांच्या गटाचे सदस्य दूर ठेवून 30 सदस्यांचा एकत्रित गट घेऊन मंगळवारपासून मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. त्याठिकाणी या तिढ्यावर मार्ग काढला जाणार असून बुधवारी सीएम देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली जाणार आहे. मुंबईत या वरिष्ठ नेत्यांचा होकार मिळताच सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे. त्यामुळे काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tanaji Sawant, om rajenimabalkar, ranajagjitsinh pati
Congress Vs BJP : 'अशोक चव्हाण खुर्चीत, नगराध्यक्ष उभे...'; काँग्रेस प्रवक्त्याने 'चव्हाण', 'देशमुख' पॅटर्नमधील फरक सांगितला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com