महेश देशमुख
Vaijapur Constituency : मतदारसंघात पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा सगळीकडेच रस्त्यांची फारच दुरवस्था झाली होती. या रस्त्यावर सायकलची घंटी सोडून सगळे पार्ट वाजायचे. मग एकही गाव सुटणार नाही, असे ठरवून रस्त्यांची कामे सुरू केली. मतदारसंघाला 218 पैकी मोजकी गावे सोडली तर आता बहुतेक ठिकाणी रस्ते झाले आहेत. काम करत असताना सगळेच चांगलं म्हणतात, असे नाही. त्यामुळे टीका करणाऱ्यांनाकडे लक्ष न देता मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधायचा आहे, असा निर्धार वैजापूरचे शिवसेना आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी व्यक्त केला.
माझ्या मतदारसंघात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न होता. गंगापूर तालुक्यातील 53 गावे माझ्या मतदारसंघात आहेत. तेथेही पाण्याची समस्या तीव्र होती. 1 हजार 75 कोटी रुपयांचे वॉटर ग्रीडचे काम मतदारसंघात सुरू केले. आज ते 70 टक्के पूर्ण झाले आहे. शंभर टक्के पूर्ण झाल्यावर मतदारसंघातील 374 गावांना आरओ फिल्टर पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे, असेही बोरनारे म्हणाले. सकाळ माध्यम समूहा तर्फे शनिवारी 'माझा मतदारसंघ, माझी भूमिका'या उपक्रमात प्रा. बोरनारे (Ramesh Bornare) यांनी आपल्या मतदारसंघाचे प्रश्न, ते सोडवण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न, विधिमंडळात त्यावर उठवलेला आवाज आणि मतदारसंघाच्या विकासाची आपली ब्लू प्रिंट अशी सविस्तर माहिती दिली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघात रस्ते, पाणी, रोजगार, उद्योग अशा अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून कामे मार्गी लावणे महत्त्वाचे आहे. (Shivsena) आज वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, 1995 पासून रखडलेल्या रोटेगाव एमआयडीसीच्या विषयावर तोडगा दृष्टिपथात आला आहे.
वैजापूर मतदारसंघात 2019 पूर्वी या मतदारसंघाला सत्ताधारी पक्षाचा आमदार नव्हता. अनेक समस्या, अडचणी होत्या. त्यामुळे निवडून आल्यावर एक जबाबदारी म्हणून मी काम सुरू केले. प्रलंबित प्रश्नांना आधी हात घालणार, हे मी त्याचवेळी ठरवले होते. त्यानुसार कामांना प्रारंभ केला. मतदारसंघात पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा सगळीकडेच रस्त्यांची फारच दुरवस्था झाली होती. या रस्त्यावर सायकलची घंटी सोडून सगळे पार्ट वाजायचे. मग एकही गाव सुटणार नाही, असे ठरवून रस्त्यांची कामे सुरू केली.
मतदारसंघाला 218 पैकी मोजकी गावे सोडली तर आता बहुतेक ठिकाणी रस्ते झाले आहेत. माझ्या मतदारसंघात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न होता. गंगापूर तालुक्यातील 53 गावे माझ्या मतदारसंघात आहेत. तेथेही पाण्याची समस्या तीव्र होती. 1 हजार 75 कोटी रुपयांचे वॉटर ग्रीडचे काम मतदारसंघात सुरू केले. आज ते 70 टक्के पूर्ण झाले आहे. शंभर टक्के पूर्ण झाल्यावर मतदारसंघातील 374 गावांना आरओ फिल्टर पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे, असा विश्वास बोरनारे यांनी व्यक्त केला.
सिंचनाचे प्रश्न सोडवतोय
वैजापूर हा सिंचन सुविधा असलेला मतदारसंघ आहे. ऊस, कापूस, सोयाबीन हे येथील शेती उत्पादन आहे. तालुक्यातील परसोडा येथील विनायक सहकारी साखर कारखाना तब्बल 25 वर्षांपासून बंद होता. माझ्या मतदारसंघात 10 लाख टन ऊस पिकतो. म्हणून मग खासगी पंचगंगा साखर कारखाना सुरू केला. सिंचनाच्या बाबतीत बोलायचे, तर जायकवाडी बॅकवॉटरवर रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना आहे. 14 गावांतील 5 हजार शेतकरी या योजनेचे सभासद आहेत. पण, ही योजना चालली नाही.
मूळ 33 कोटींची योजना आता 215 कोटींपर्यंत गेली. त्या कर्जाचा भार शेतकऱ्यांवर आला. या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे आणि पाणी योजना सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे जाऊन 64 कोटी 25 लाख रुपयांचे कर्ज माफ करून घेतले. आता या 14 गावांसाठी ही योजना सुरू करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.
उद्योगाशिवाय पर्याय नाही
एमआयडीसीच्या प्रश्नावर सविस्तर भाष्य करताना बोरनारे म्हणाले, वैजापूर मतदारसंघातील रोटेगाव एमआयडीसीचा प्रश्न 1995 पासून रेंगाळत आहे. 1995 मध्ये 426 एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली. पण, मोबदल्यासाठी काही शेतकरी कोर्टात गेले. त्यांना जादा मोबदला हवा आहे. यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करून सर्वांना फायदेशीर राहील, असा मध्यम मार्ग काढण्यात आला आहे. कोर्टात गेलेल्या शेतकऱ्यांना वाजवी मोबदला मिळावा आणि सर्वांना 15 हजार रु. प्रति एकर वाढीव मोबदला देण्याचा निर्णय झाला आहे.
आज माझ्या मतदारसंघातील रोटेगाव, परसोडा, करंजगाव आदी ठिकाणांहून दररोज शेकडो तरुण कामासाठी छत्रपती संभाजीनगरला जातात. अशा सगळ्यांच्या हाताला काम द्यायचे असेल तर येथेच उद्योग असायला हवेत, याच हेतूने एमआयडीसी सुरू होणार आहे. दरडोई दोन-पाच एकर शेती येत असेल तर उद्योगाशिवाय पर्याय नाही. राजकारणाच्या आधी समाजकारण हे तत्त्व मी पाळत आलो आहे. माझ्या कार्यालयात रोज तीन-चार पेशंट येत असतात. कुणाला वैद्यकीय मदत हवी असते, कुणाला मुख्यमंत्री निधीतून मदत हवी असते, कुणाला ऑपरेशनची समस्या असते.
अनेक वर्षांपासून माझी ॲम्ब्युलन्स सेवा आहे. माहिती मिळताच अपघाताच्या ठिकाणी माझी ॲम्ब्युलन्स पोचतेच. एका अपघात प्रकरणात न्यायालयात मला नेमकी तुमचीच ॲम्ब्युलन्स अशा ठिकाणी अशा वेळी कशी असते असे विचारून निरुत्साही करण्याचा प्रयत्न झाला. पण, मी ठाम आहे. मी त्याचे वाईट वाटून घेत नाही. मी निंदकांकडे लक्ष देत नाही. 75 जण जिंदाबाद म्हणणारे असतील तर 25 जण मुर्दाबाद म्हणणारे असतातच. सगळेच आमदाराला चांगले म्हणत नाहीत, हेही सत्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.
जिल्ह्याच्या विकासावरही बोलणार
मी अधिवेशनात फक्त मतदारसंघावरच बोलत नाही, तर जिल्ह्याच्या एकूण विकासावर आवर्जून बोलतो. राज्यातील महानगरांबद्दल नुकतीच अधिवेशनात चर्चा झाली. त्यात मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसारख्या शहरांवर होत असलेल्या खर्चाबाबत मी आणि आमदार बंब बोललो. त्या महानगरांसोबतच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यालाही मोठा निधी मिळाला पाहिजे, हे ठासून मांडले. छत्रपती संभाजीनगरात पायाभूत सुविधा वाढाव्यात, शिक्षण क्षेत्रात आणखी काय करता येईल यावर मी बोललो आणि कायम बोलत राहणार, असेही बोरनारे यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.