Tanaji Sawant: प्रचंड 'फिल्डिंग' लावूनही मंत्रिपदाचं स्वप्नं भंगलं, नाराज सावंतांनी निवेदन काढत दिली 'ही' मोठी अपडेट

Mahayuti Government Cabinet Expansion : मागील मंत्रिमंडळात असलेले तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांना पुन्हा संधी नाकारण्यात आली आहे. यातील माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी शेवटपर्यंत जोरदार प्रयत्न केले.
Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

Pune News : शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून चार काही दिग्गज नेत्यांचा मंत्रिमंडळ विस्तारातून पत्ता कट करण्यात आला. त्यात तानाजी सावंत (Tanaji Sawant) ,दीपक केसरकर,अब्दुल सत्तार,विजय शिवतारे यांच्यास राजेंद्र गावितही नाराज आहे. त्यातच मंत्रिमंडळातून डावलण्याने नाराज भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकरांनी यांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा देत त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.

त्यातच आता महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची हुलकावणी दिल्याने नाराज झालेले माजी आरोग्यमंत्री व शिवसेना नेते तानाजी सावंत हे अधिवेशन सोडून पुण्यात दाखल झाले आहेत. यानंतर त्यांनी सावंत यांच्या समर्थकांकडून मोठी अपडेट दिली आहे. माझ्याशी कुणी संपर्क करू नये,मला बोलायचं त्यावेळी बोलेन,अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातून माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजीची लाट उफाळून आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलेला शब्द पाळला नाही असा आरोपही कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

Tanaji Sawant
Chandrakant Patil : मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आता पालकमंत्री कोण? चंद्रकांतदादा कोल्हापुरात परतणार?

माजी आरोग्यमंत्री आणि परंड्याचे आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत हे नाराज मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर नाराज असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपल्या माध्यमातून वाचायला आणि पाहायला मिळत आहेत. त्यांचे समर्थक परांडा येथे रस्त्यावर उतरत आक्रमक झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पण आता सावंत यांच्याकडून एक निवेदन प्रसिध्द करण्यात आलं आहे.

'...तोपर्यंत कृपया कुणीही बाईटसाठी पाठपुरावा करू नये!'

या निवेदनात सन्माननीय माजी आरोग्यमंत्री आणि परंड्याचे आमदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंतसाहेब हे नाराज असल्याच्या बातम्या आपल्या माध्यमातून वाचायला आणि पाहायला मिळत आहेत. त्यावरून सातत्याने सावंत साहेबांशी प्रतिक्रिया आणि बाईटसाठी विचारणा केली जात असल्याचं सावंत यांच्या समर्थकांकडून निवेदनात म्हटलं आहे.

Tanaji Sawant
Sudhir Mungantiwar meet Gadkari : मंत्रिपदाने अखेरच्या क्षणी हुलकावणी दिलेले मुनगंटीवार गडकरींच्या भेटीनंतर म्हणतात, 'मी..'

तसेच सावंतांना ज्यादिवशी या सगळ्याबाबत बोलायचे आहे, त्यादिवशी आपल्या सगळ्यांशी निश्चितपणे संपर्क साधला जाईल. तोपर्यंत कृपया कुणीही बाईटसाठी पाठपुरावा करू नये,ही विनंती करतानाच सोमवारी (ता. 16) संध्याकाळीही सावंत हे बाईटसाठी उपलब्ध नसतील, याची कृपया नोंद घ्यावी, असंही सावंत यांच्या समर्थकांकडून कळवण्यात आले आहे.

तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या निर्णयाबद्दल फेरविचार करत सावंतांना पुन्हा आरोग्यमंत्री हे पद देण्यात यावं अशी मागणीही करण्यात आली आहे. शिंदे यांनी सावंतांच्या प्रचारार्थ सभेत मतदारांना तानाजी सावंत यांना 'तुम्ही आमदार करा, मी नामदार करतो' अशी घोषणा केली होती. आता शिंदे यांनी सावंतांना दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली जात आहे.

Tanaji Sawant
Maharashtra Cabinet Expansion: 'तुम्ही निवडून द्या, संभाजी पाटलांना मंत्री करु' ; पक्षश्रेष्ठींनी शब्द फिरवला! कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

फिल्डिंग लावली,पण तरीही संधी हुकलीच..

मागील मंत्रिमंडळात असलेले तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांना पुन्हा संधी नाकारण्यात आली आहे. यातील माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी शेवटपर्यंत जोरदार प्रयत्न केले.

एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना तब्बल पाच तास प्रतीक्षा करावी लागली होती. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्रिपदासाठी संधी मिळत नसल्याचे पाहून सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शिंदेंकडे फिल्डिंग लावली होती. मात्र, फडणवीस यांच्याकडून प्रयत्न करूनही मंत्रिमंडळात सावंत यांना संधी मिळू शकलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com