Shivsena Politic's : ज्योती वाघमारे यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी; खासदार धैर्यशील माने सोलापूरचे, तर चंद्रहार पाटील माढ्याचे संपर्कप्रमुख

Jyoti Waghmare News : शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय संपर्कप्रमुखांची नियुक्ती करत तयारी सुरू केली असून धैर्यशील माने, चंद्रहार पाटील आणि ज्योती वाघमारे यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
jyoti waghmare-dhairyasheel mane-chandrahar patil
jyoti waghmare-dhairyasheel mane-chandrahar patilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 31 March : लोकसभा निवडणुकीसाठी आणखी तीन वर्षांचा कालावधी असतानाच शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेने आज लोकसभा मतदारसंघनिहाय संपर्कप्रमुखांची नियुक्ती केली आहे. यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी खासदार धैर्यशील माने, तर डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे माढ्याचे संपर्कप्रमुख असणार आहेत. विशेष म्हणजे नुकतेच राज्यसभा सदस्य झालेल्या प्रा. ज्योती वाघमारे यांच्याकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी असणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (Shivsena) २०२९ च्या लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक बांधणीस सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने शिंदे यांनी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात शिवसेना मजबूत करण्यासाठी संपर्कप्रमुख म्हणून आजी माजी आमदार, खासदार आणि प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे.

संघटनेतून पुढे आलेल्या खासदार प्रा. ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे. प्रा. वाघमारे यांच्याकडे शिर्डीची जबाबदारी देणे विशेष मानले जाते. कारण तो मतदारसंघ राखीव असून त्या दृष्टीकोनातून वाघमारे यांची नियुक्ती वेगळी ठरते.

कदाचित पक्षनेतृत्वाने लोकसभेची तयारी म्हणून प्रा. ज्योती वाघमारे यांना शिर्डीत पाठविले नाही ना, अशीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वाघमारे यांना शिर्डीत पाठवून योग्य डाव खेळल्याचे मानले जात आहे.

jyoti waghmare-dhairyasheel mane-chandrahar patil
Satara ZP Update : जयकुमार गोरेंनी पुन्हा शड्डू ठोकला : सातारा ZP त सभापती भाजपचेच होणार; शंभूराज, मकरंदआबांची पुन्हा कसोटी

दुसरीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी हातकंणगल्याचे खासदार धैर्यशील माने यांच्याकडे देण्यात आलेली आहे. त्यांना सोलापूरमध्ये अस्तित्वात असलेली पक्षसंघटना मजबूत करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. अनेक बड्या नेत्यांचे रुसवे-फुगवे सांभाळत शिवसेना पक्षाची बांधणी करावी लागणार आहे.

jyoti waghmare-dhairyasheel mane-chandrahar patil
Ashok Kharat Solapur Connection : अशोक खरातचं सोलापूर कनेक्शन उघड; माजी आमदाराकडून खरातच्या मुलीला 32 लाखांचा फ्लॅट भेट

माढ्यात मात्र शिवसेना उभी करण्यासाठी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना मोठे कष्ट घ्यावे लागणार आहे. कारण माढ्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत स्थितीत आहे, त्यामुळे शिवसेना या दोन्ही पक्षांशी टक्कर देत पक्षासाठी स्पेस तयार करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com