

Sangli, 07 July : गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निवडींना अखेर सोमवारी मुहूर्त मिळाला. या समितीवर जिल्ह्यातील जवळपास 15 जणांना संधी मिळाली आहे. खासदार धैर्यशील माने, यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर, जनसुराज्य पक्षाचे समित कदम यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपला ७, शिवसेना ३, राष्ट्रवादी काँग्रेस 1 यासह घटक पक्ष असलेल्या रिपाई आठवले गट, जनसुराज्य पक्ष, रयत क्रांती संघटना यांच्या प्रत्येकी एक जणांना संधी देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे भाजपकडून सर्वाधिक सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून आता जिल्ह्याचे नियोजन करणार अशी स्थिती आहे.
जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित सदस्य तसेच विशेष निमंत्रित सदस्यांची निवड केली जाते. मागील काही महिन्यांपासून नियोजन समितीवरील सदस्यांच्या निवडी रखडल्या होत्या. मात्र, सरकारकडून अखेर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
डीपीसीवर विधीमंडळ आणि संसद सदस्यांमधून खासदार धैर्यशील माने, आमदार गोपीचंद पडळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय अनुभव असलेल्या दोन सदस्यांमधून भाजप नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांचीही निवड झाली.
उर्वरित सदस्यांमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, माजी नगरसेविका भारती दिगडे, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचा समावेश आहे.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते समित कदम, रिपब्लिकन आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात आणि रयत क्रांती संघटनेचे अमोल पाटील यांची निवड झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.