

चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील भाजप नगरसेवकांना अंतर्गत वाद बाहेर न नेता समन्वयाने काम करण्याचा सल्ला दिला.
सत्तांतराचा सकारात्मक परिणाम नागरिकांना दिसावा यासाठी जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
भाजप कोअर कमिटी आणि नगरसेवकांच्या बैठकीत पक्षातील एकतेवर भर देण्यात आला.
sangli news : ‘‘आपसांतील वाद चार भिंतीच्या मतभेद बाहेर जाऊ नयेत. मतभेद बाजूला ठेवून एकसंधपणे समन्वयाने काम करा. नागरिकांना सत्तांतराचा सकारात्मक परिणाम दिसला पाहिजे. जनतेच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करा,’’ अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. चंद्रकांत पाटील यांनी आज भाजप कोअर कमिटीची बैठक घेतली. त्यानंतर महापालिकेच्या सर्व नगरसेवकांचीही त्यांनी बैठक घेतली.
बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, महापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अतुल माने, माजी आमदार दिनकर पाटील, दीपक शिंदे, पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज पवार, जयश्री पाटील, पांडुरंग कोरे आदी उपस्थित होते. सुरुवातीस कोअर कमिटीची बैठक झाली.
‘‘आपसांतील मतभेद दूर करून समन्वयाने काम करा. जनतेने आपल्यावर विश्वास ठेवला आहे, तो सार्थ करायचा आहे. सांगलीला चांगले प्रकल्प आणायचे आहेत. महापालिकेच्या प्रश्नासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर आढावा बैठक घेतली जाईल,’’ असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
नगरसेवकांच्या बैठकीत महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमधील मतभेदांवर चर्चा झाली. नगरसेवकांनी महापौर सभापती एकत्र राहिले पाहिजेत, असे सांगितले. तसेच पाणी टंचाई, रस्ते, ड्रेनेज, पथदिवे यांसह अत्यावश्यक नागरी समस्यांचा पाढा वाचला. मूलभूत सुविधांचे प्रश्न मांडले. फंड मिळू शकत नाही, अशी कैफियत मांडली.
सांगलीत भाजप कोअर कमिटी आणि नगरसेवकांच्या बैठकीत संघटनात्मक शिस्त, समन्वय आणि जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. सत्तांतराचा सकारात्मक परिणाम नागरिकांना जाणवला पाहिजे, असे ठामपणे सांगितले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, वादाचा मुद्दा नाही, मी ते पाहतो. पण, घरातील मतभेद चार भिंतीच्या आत ठेवा, अंतर्गत वाद सार्वजनिक होऊ नयेत. समन्वयाने काम करून जनतेने ठेवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचे आवाहन त्यांनी केले.
नगरसेवक, प्रभारींचा सत्कार
यावेळी पालकमंत्री पाटील यांनी पक्षाने प्रभारीपदी नियुक्त केलेले शेखर इनामदार, पृथ्वीराज पाटील, तसेच स्वीकृत नगरसेवक झालेले विश्वजित पाटील, केदार खाडिलकर, दरिबा बंडगर यांचा सत्कार केला.
1. चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांना काय सांगितले?
त्यांनी अंतर्गत वाद बाहेर न नेता समन्वयाने काम करण्याचा सल्ला दिला.
2. ही बैठक कुठे झाली?
सांगली महानगरपालिकेत भाजपची बैठक झाली.
3. बैठकीचा मुख्य उद्देश काय होता?
पक्षातील एकता राखणे आणि जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे.
4. कोणत्या विषयावर विशेष भर देण्यात आला?
समन्वय, एकता आणि सत्तांतराचा सकारात्मक परिणाम यावर भर देण्यात आला.
5. या बैठकीचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
भाजपमध्ये एकजूट वाढून स्थानिक प्रशासन अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.