Bawankule Call To Ajitdada : अजितदादा...वापस या ना! महाराष्ट्राची जनता तुमची वाट बघतेय : बावनकुळेंचा अजितदादांना फोन

Chandrashekhar Bawankule Interview : अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र शोकाकुल. कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी भावनिक आवाहन करत ‘अजितदादा परत या’ अशी हाक दिली. राज्यातील राजकीय वर्तुळात शोक आणि चर्चा कायम.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Sarkarnama
Published on
Updated on

Pune, 27 February : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे अवघा महाराष्ट्र हळहळत आहे. दादा आपल्यात नाहीत, यावर अनेकांचा आजही विश्वास बसत नाही. दादांचा मृत्यू हा राज्यातील जनतेसाठी मोठा धक्का होता, तसा तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांचे नेते आणि महायुतीमधील नेत्यांसाठी धक्कादायक होते. त्याच धक्क्यातून अद्याप न सावरलेले राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी एका कार्यक्रमात अजितदादांना फोन लावून ‘अजितदादा परत या ना, महाराष्ट्राची जनता तुमची वाट बघतेय’ अशी आर्त हाक दिली. ती करताना बावनकुळेंचा कंठ दाटला होता.

अजित पवार (Ajit Pawar) यांचा ता. २८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान अपघातात मृत्यू झाला. दादांच्या अकाली एक्झिटमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालेला आहे. अनेकजण अजूनही त्या धक्क्यातून सावरू शकलेले नाहीत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात दादांच्या शोकप्रस्तावावर बोलताना अनेकांना आश्रू आवरता आले नाही.

महायुतीमधील अनेक नेत्यांनी आपल्या सर्वाधिक मौल्यवान सहकाऱ्याच्या आठवणींना विधानसभेत उजाळा दिला. महायुती सरकारमधील अजित पवारांचे सहकारी आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना ‘इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो’ मधील मुलाखतीमध्ये तुमच्या आवडत्या व्यक्तीला फोन लावा, असे सांगण्यात आले, तेव्हा बावनकुळेंनी थेट अजितदादांना फोन लावला.

आदरणीय अजितदादा...अर्थसंकल्प सादर करायचा आहे, वापस या ना.... अजितदादा परत या ना....महाराष्ट्रातील जनता तुमची वाट बघतेय, असं संभाषण बावनकुळे यांनी फोनवर केले. ही दोन वाक्येही बोलताना महसूल मंत्री बावनकुळेंचा कंठ दाटून आला होता. आवाज घोगर झाला होता. त्यामुळे वातावरणही धीरगंभीर बनले होते.

दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला उद्या (ता. २८ फेब्रुवारी) एक महिना होत आहे. दादांच्या मृत्यूप्रकरणी व्हीएसआर कंपनीच्या चार विमानांना उड्डाणास बंदी घालण्यात आलेली आहे. डीजीसेएने ही कारवाई केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com