Prashant Koratkar : कोरटकरबद्दल महत्वाची बातमी! उच्च न्यायालयाकडून हजर राहण्याचे आदेश

Indrajit Sawant Threat Case : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कधीही अटक होण्याची शक्यता आहे.
Prashant Koratkar On Indrajit Sawant
Prashant Koratkar On Indrajit SawantSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीकडे कोल्हापूरसह राज्याचे लक्ष लागले आहे. आजची सुनावणी कोरटकर याच्या जामीन अर्जावर होणार आहे.

प्रशांत कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. यामुळे त्याच्याविरोधात कोल्हापुरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण त्याला अद्याप अटक झालेली नसून त्याला न्यायालयाने 11 मार्चपर्यंत अंतरिम जामीन दिला होता.

यानंतर कोल्हापूरमधील जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडून हा अंतरिम जामीन रद्द करण्याची मागणी केली होते. सोमवारी 10 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्यायाधीश राजेश पाटील यांनी कोरटकरला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तर याच प्रकरणात आज (ता.11) पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.

Prashant Koratkar On Indrajit Sawant
Prashant Koratkar : "माझा मोबाईल..." प्रशांत कोरटकरचा नवा दावा; इंद्रजीत सावंतांना फोन केलाच नाही म्हणत सायबर पोलिसांकडे केली मोठी मागणी

सावंत यांना धमकी दिल्यानंतर कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांमध्ये कोरटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तर पोलिस त्यांच्या शोधात त्याच्या दारापर्यंत पोहचले होते. यामुळे त्याने कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेऊन 11 मार्चपर्यंत अंतरीम जामीन मंजूर केला होता. आज या अंतरीम जामीनाची मुदत संपत आहे.

धमकी प्रकरणात इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचे आवाजाचे टेस्टिंग फॉरेन्सिक लॅब कडून घेण्यात आले आहेत. मात्र कोरटकर याचे टेस्टी अद्याप झालेले नाही. त्यामुळे जुना राजवाडा पोलिसांना कोरटकरच्या अटकेची प्रतीक्षा करावी लागणारच आहे. त्याला अटक केल्यानंतरच त्याच्या आवाजाची स्वर, आवाजाची पद्धत, बोलण्यातील चढ-उतार, या सर्वांचा अभ्यास करून तपास केला जाणार आहे.

Prashant Koratkar On Indrajit Sawant
Prashant Koratkar : पोलिसांनी कारवाईचा फास आवळताच कोरटकर नरमला, आता म्हणतो...

दरम्यान, इंडिया आघाडीकडून सोमवारी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांची भेट घेऊन कोरटकर याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. सध्या कोरटकर मोकाट असल्याने विद्या संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी इंडिया आघाडीने पोलीस प्रमुखांकडे केली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com