Satara Dcc Bank Election : सातारा जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण? मंत्री गोरे CM फडणवीसांच्या मेसेजसाठी आग्रही, शिवेंद्रराजे, मकरंद आबा अन् देसाईंचा स्थानिक पातळीवर निर्णयाचा आग्रह!

Mahayuti leaders' meetings News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बँकेच्या या महत्त्वाच्या पदांसाठी येत्या १८ नोव्हेंबरला सकाळी साडेअकरा वाजता विशेष सभा बोलावण्यात आली आहे.
Satara Dcc Bank Election
Satara Dcc Bank ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara News : जिल्हा बँकेच्या पदाधिकारी निवडीवरून सध्या महायुतीतील नेत्यांत गाठीभेटींचे सत्र सुरू असल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. येत्या बुधवारी होणाऱ्या या निवडीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. बँकेचा अध्यक्ष महायुतीतील कोणत्या पक्षाचा होणार, याची उत्सुकता ताणली असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणाच्या नावाचा मेसेज येणार, का जिल्ह्यातील नेते एकत्र बसून अध्यक्ष ठरविणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बँकेच्या या महत्त्वाच्या पदांसाठी येत्या १८ नोव्हेंबरला सकाळी साडेअकरा वाजता विशेष सभा बोलावण्यात आली असून, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होणार आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

फॉर्म्युल्याची चर्चा...

सध्या बँकेच्या 29 जागांच्या बलाबलानुसार भाजप 9 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 8 आणि शिवसेनेकडे 4 जागा आहेत. असे असले, तरी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकत्रित संचालक संख्या 12 होत असल्याने समीकरणे अत्यंत रंजक बनली आहेत. महायुतीमध्ये कोणताही बाद किंवा कलगीतुरा उफाळून येऊ नये, यासाठी दोन वर्षे भाजप, दोन वर्षे राष्ट्रवादी आणि एक वर्ष शिवसेना असा एक अलिखित फॉर्म्युला ठरल्याची चर्चा रंगली आहे.

Satara Dcc Bank Election
Satara Dcc Bank President : सातारा DCC बॅंकेच्या अध्यक्षपदाबाबत शिवेंद्रराजेंनी मांडली भूमिका; गोरेंचे ते मत खोडत सांगितला फॉर्म्युला...

नेत्यांचा सूर विसंगत

या अध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुतीमधील नेत्यांचे सूर विसंगत असल्याचे दिसत आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar gore) यांनी, बँकेच्या अध्यक्षाचे नाव थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बंद लिफाफ्यातून किंवा मोबाईल मेसेजद्वारे येईल, असे सांगून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याउलट, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेद्रसिंहराजे भोसले यांनी अध्यक्ष हा जिल्ह्यातच ठरवला जाईल, अशी रोखठोक भूमिका मांडली आहे. त्यामुळे महायुतीतच अंतर्गत कुस्ती रंगण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Satara Dcc Bank Election
Gokul chairman: गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक तहकूब, मुश्रीफांचं बंटींकडे बोट

यापूर्वी जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेदरम्यान भाजपने (BJP) दोन्ही प्रमुख पदे आपल्याकडे खेचून घेतल्याने महायुतीत मोठा संघर्ष आणि तणाव निर्माण झाला होता. गोकुळ दूध संघ पॅटर्नप्रमाणे मित्रपक्षांना संधी देऊन ती चूक सुधारली जाणार की जिल्हा बँकेतही पुन्हा एकदा तोच फॉर्म्युला राबवला जाणार, यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भूमिका ठरणार आहे. मात्र, येत्या १६ व १७ नोव्हेंबरला महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

Satara Dcc Bank Election
Gokul Chairman Election : गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांच्या मनात वेगळंच नाव होतं : चुयेकरांचं नाव मी पुढे आणलं होतं : मुश्रीफांचा गौप्यस्फोट

गाठीभेटीतून समीकरणांची जुळवाजुळव

या निवडणुकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांना त्यांच्याकडील मतांच्या तुलनेत कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सातारा व जावळी तालुक्यासाठी अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपद मिळावे, यासाठी ते कमालीचे आग्रही आहेत. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावी मुक्कामी असून, नुकतीच शिवेंद्रसिंहराजेंनी त्यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

सर्वाधिक नऊ जागा जिंकून भाजप 'मोठा भाऊ' ठरला असला तरी राष्ट्रवादी-शिवसेना युतीची संख्याबळ बाजू भक्कम आहे. अशा स्थितीत पहिल्यांदा संधी कोणाला मिळणार आणि मुख्यमंत्री फडणवीस महायुतीत समतोल साधण्यासाठी कोणाचे नाव निश्चित करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, रविवारपासून सुरू होणाच्या बैठकांमध्ये यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

Satara Dcc Bank Election
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नेत्यांना नेमका काय फायदा होतो? निवडणुकीपासून सत्तेपर्यंतचं गणित

संभाव्य नावे आणि लॉबिंग

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही सर्व घटक पक्षांनी समन्वयाने चर्चा करून निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले आहे. भाजपकडून आमदार डॉ. अतुल भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नावांची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाकडून चंद्रकांत जाधव आणि ज्ञानदेव रांजणे यांची नावे पुढे येत आहेत. सातारा आणि जावळी तालुक्याला योग्य तो मान मिळावा म्हणून मंत्री शिवेंद्रसिंहराजे आग्रही आहेत, तसेच मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्याकडूनही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून उदयसिंह पाटील यांचे नाव अध्यक्षपदाच्या चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंत्री मकरंद पाटील यांच्याकडेच अध्यक्षपदाची धुरा सोपवावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.