

Sangli News : सांगलीच्या मिरजेचे उद्धव ठाकरे गट शिवसेना शहरप्रमुखांची ईडीकडून चौकशी झाल्याचं समोर आले आहे. मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांची चौकशी झाली असून पुढील चौकशीसाठी पुन्हा कार्यलयात हजर राहण्याबाबत ईडीकडून (ED) सांगण्यात आले आहे.
सांगली शहराम दोन महिन्यांपूर्वी व्यापारी पारेख बंधुंच्या घरावर छापे टाकण्यात आले होते. या छाप्या प्रकरणी चंद्रकांत मैंगुरे यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती आणि 6 जुलै रोजी त्यांची चौकशी झाली होती. आता पुन्हा एक सप्टेंबर पर्यंत ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याबाबत फोनवरून सांगण्यात आल्याचा चंद्रकांत मैंगुरे यांनी सांगितला आहे.
तसेच आपली जागा पारेख बंधूंना विकण्यात आली होती. त्याबाबत आपले त्यांच्याशी देवाणघेवाण झाल्याचेही मैंगुरे यांनी स्पष्ट केले आहे. चंद्रकांत मैंगुरे हे ठाकरे गटाचे आक्रमक नेते आहेत. अनेक आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग असतो. मिरज शहर आणि परिसरात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.
गेल्या महिन्यातच चोरीच्या प्रकरणात मैंगुरे यांना अटक करण्यात आली होती. मिरजेतील एका कंपनीच्या जुन्या चेकबुक पुस्तकातील 20 लाख रुपये रकमेचा चेक चोरून बँकेच्या खात्यावरून 15 लाख 17 हजार दोनशे पाच रुपये काढल्याचा त्यांचा आरोप होता. याप्रकरणी मधूकुमार यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी मैंगुरेंना जुलै महिन्यात अटक करण्यात आली होती.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.