Amal Mahadik : आमदार सतेज पाटलांना लपूनछपून नाही तर उघडपणे भेटतो : आमदार अमल महाडिकांची धक्कादायक कबुली

Satej Patil Statement : कोल्हापूरमध्ये सतेज पाटील आणि अमल महाडिक यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण राज्याला परिचित आहे. पण, महाडिक यांच्या नव्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
Satej Patil-Amal Mahadik
Satej Patil-Amal MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 05 May : कोल्हापूर जिल्ह्यातील कट्टर राजकीय विरोधक म्हणजे आमदार सतेज पाटील आणि आमदार अमल महाडिक. केवळ कोल्हापूर जिल्ह्यालाच नव्हे; तर संपूर्ण राज्याला या दोन गटाचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. निवडणूक ग्रामपंचायतीची असो, लोकसभेची, गोकुळ दूध संघाची अथवा राजाराम सहकारी कारखान्याची पाटील आणि महाडिक यांच्यातील संघर्ष कायम असतो.

महाडिक विरुद्ध पाटील संघर्ष केवळ नेत्यांमध्येच नाही; तर तो तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोचला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या विधानावर धक्कादायक स्पष्टीकरण देत खळबळ उडवून दिली आहे.

आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांना लपूनछपून नाही, तर उघड उघड भेटतो. ‘कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आमच्या खुल्या बैठक होत असतात’, असे आमदार अमल महाडिक यांनी स्पष्ट करत खळबळ उडवून दिली आहे. कोल्हापूर महापालिका निवडणूक कार्यालयातील आढावा बैठकीनंतर आमदार महाडिक बोलत होते.

काही दिवसांपूर्वी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी आमदार अमल महाडिक भेटतात. मात्र, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ भेटत नाहीत. त्यांची वेळ काही मिळत नसल्याचा टोला लगावला होता.

Satej Patil-Amal Mahadik
Dhairyasheel Mohite Patil : मोहिते पाटील शिंदेसेनेच्या वाटेवर; खासदार धैर्यशील म्हणाले, ‘आम्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटायचं नाही का?’

त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यामधील दुरावा स्पष्ट झाला होता. आमदार सतेज पाटील यांनी आमदार अमल महाडिक यांचे नाव घेतल्यानंतर सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला होता. शिवाय कार्यकर्त्यामध्ये उलटउलट चर्चा सुरु होती. यावर आमदार महाडिक यांच्याकडून काय उत्तर येते, याची उत्सुकता होती.

Satej Patil-Amal Mahadik
Nashik MHADA Scam : दोन तलाठ्यांनीच केला नायब तहसीलदार नितीन पाटलांचा भांडाफोड, आता महसूल विभागाचेही दणाणले धाबे

सतेज पाटील यांनी केलेल्या त्या विधानावर आमदार महाडिक यांना विचारले असता, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आम्ही दोघेही संचालक आहोत. आमची कुठे ना कुठे भेट होतच असते. योगायोगाने एकमेकांना दिसल्यानंतर आम्ही हसतो. या व्यतिरिक्त काहीही राजकारण नाही. जिल्हा बँक आणि कोल्हापूरच्या हिताच्या विषयावर चर्चा होत असते. त्यात लपूनछपून असे काही होत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com