Kolhapur Crime : खर्चाला पैसे देण्यास नकार दिल्याने महिला सभापतीच्या नवऱ्याची प्रेयसीला बेदम मारहाण; तब्बल अकरा वर्षांपासून...

Kolhapur Woman Assault Case : खर्चाला पैसे देण्यास नकार दिल्याने महिलेला मारहाण केल्याप्रकरणी इस्माईल शौकत अली बागवान (रा. राजाराम चौक) याच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
Police investigation underway in the Kolhapur assault case
Police investigation underway in the Kolhapur assault case where a woman accused her longtime partner of physical assault over financial disputes. The incident has created a major buzz in Kolhapur crime news.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 07 May : अकरा वर्ष संबंध असणाऱ्या महिलेला महिला सभापतीच्या पतीकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. 'खर्चाला पैसे दे' म्हणून संबंधित महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे.

या संदर्भात संबंधित महिलेने कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात महिला सभापतीच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खर्चाला पैसे देण्यास नकार दिल्याने महिलेला मारहाण केल्याप्रकरणी इस्माईल शौकत अली बागवान (रा. राजाराम चौक) याच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयिताचे अकरा वर्षापासून संबंधित महिलेशी ओळख होती. तो वारंवार महिलेकडे पैशाची मागणी करत होता. पैसे देण्यासाठी नकार दिल्याच्या रागातून बुधवारी सायंकाळी तिला बेदम मारहाण केली. शिवाजी पेठ येथील राजाराम चौक येथे ही घटना घडली.

Police investigation underway in the Kolhapur assault case
Suvendu Adhikari PA Death : ओव्हरटेक करणाऱ्या गाडीला पुढं जाऊ दिलं अन् तिथेच घात झाला; हल्लेखोरांनी सुवेंदू अधिकारींच्या पीएला नेमकं कसं संपवलं?

संबंधित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर बागवान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.

Police investigation underway in the Kolhapur assault case
Thalapathy Vijay : थलापती विजयचं मुख्यमंत्रिपद धोक्यात? शपथ घेण्यापूर्वीच 2015 मधील 'त्या' प्रकरणी FIR दाखल करण्याची हायकोर्टात मागणी

दरम्यान सायंकाळ नंतर हे प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, तोपर्यंत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात संबंधित बागवान यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com