Kolhapur News: बाळूमामाच्या भंडाऱ्यात धक्कादायक भाकणूक! राजकारणात भूकंप, इस्लामिक राष्ट्रे पेटणार?

Kolhapur News: महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधील भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथील संत बाळूमामाचा भंडारा उत्सव पार पडला.
Kolhapur News
Kolhapur News
Published on
Updated on

Kolhapur News: महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधील भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथील संत बाळूमामाचा भंडारा उत्सव पार पडला. या उत्सवाला लाखों भाविकांची गर्दी उसळली होती. तर या यात्रेतील भाकणूक ऐकण्यासाठी पंचक्रोशी राज्यभरातून भाविक आदमापूर येथे दाखल झाले होते. आजवर झालेल्या अनेक भाकणूक जवळपास तेच घडत आले आहे. यंदाही अशीच धडकी भरवणारी भाकणूक झाली. गल्लीपासून ते जगात काय होईल, यांचा सार या भाकणुकीत मांडला. या यात्रेत कृष्णात डोणे महाराजांनी भाकणूक केली.

Kolhapur News
Rat Bites ICU Patient : धक्कादायक! आयसीयुतील रुग्णाचा हात उंदराने कुरतडला, सरकारी रुग्णालयातील धक्कादायक घटना

सध्या जग तिसऱ्या महायुद्याच्या उंबरठ्यावर आहे. देशात महागाई वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज पहाटे चार वाजता सुरु झालेला भाकणुकीचा सोहळा सकाळी सहा वाजता संपला. जगातील इस्लामिक राष्ट्रे पेटून उठतील, आपापसात युद्ध करतील. मोठं नुकसान होईल. देशाच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल, साखर कारखान्याचा मॅनेंजर आनंदात राहील. कोरोनापेक्षा मोठा आजार येईल, शंभर वर्षांनंतर माणूस पृथ्वी सोडेल, कर्नाटक राज्याच्या जलाशयाला मोठे भगदाड पडेल, अशी भाकणूक आज झाली. आदमापूर येथील बाळूमामा भंडारा उत्सवामध्ये त्यांचा भाकणुकीचा कार्यक्रम झाला मराठी वर्षातील ही शेवटची भाकणूक असल्याने या भाकणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

Kolhapur News
Khatav Sabhapati : खटावमध्ये जयकुमार गोरेंची खेळी ; सभापतिपद माणकडे, उपसभापतिपद दिले शिंदेसेना आमदाराच्या मतदासंघात

आदमापूर हे गाव प्रतिपंढरपूर होईल, होईल होईल जलप्रलय होईल, कर्नाटकच्या जलाशयाला मोठं भगदाड पडंल, जातीवाद, राजकारण, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न चर्चेत येईल. रेल्वे, विमाने मोठ्या वाहनांचे अपघात होतील, कर्नाटक राज्याचे राजकारण डळमळीत होणार. छोटे पक्ष राज्याच्या राजकारणात मोठे होतील, देशात मात्र कमळ फुलणार, बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेल, जगात सत्त्य फासावर जाणार, १२ वर्षांची मुलगी भ्रतार मागेल, तरुण पिढी वाईट मार्गाला लागेल, ३५ वर्षांचं म्हातारपण येईल, अशी भाकणूक पार पडली.

Kolhapur News
Ministers absent budget session: विधानसभेत विरोधकांचा आक्रमक पवित्रा! कामगार मंत्री कुठे, बांधकाम मंत्री कुठे? सुनील प्रभूंच्या प्रश्नाने सभागृह गाजले

कोरिया जगासाठी घातक ठरतील, चीन भारतावर आक्रमण करेल. भारत पाकिस्तानमध्ये मोठे युद्ध होईल. तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल. भारतीय सैनिक सीमेवर लढत राहतील. पाकिस्तानचा चौथा हिस्सा कोणी काबीज करेल. राजकीय नेते मोठमोठ्या घोटाळ्यात अडकून पडतील, तुरुंगात जातील. महागाईचा भस्मासुर वाढेल. जनता हैरान होईल. भाववाढीने जगणं मुश्किल होईल.

Kolhapur News
Parliament Security : संसदेच्या आवारात वाहनाची घुसखोरी, सायरन वाजले अन् एकच धावपळ..! नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...

मेघ राजा ताळतंत्र सोडेल, सुनामी वादळ होईल. मोठं नुकसान होईल भूकंप होतील. जनतेला नुकसानीला सामना करावा लागेल. जंगलातले प्राणी पक्षी गावात येतील मनुष्य जंगलात राहायला जाईल. बारा कोसावर दिवा दिसेल. गाव बाजार येईल आंतरराष्ट्रीय बाजारपेठा तेजी मंदीत राहतील. हिंदू धर्माला चांगले दिवस येतील. जगातील अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील. भारत देश हिंदुराष्ट्र होईल, भारत मातेचा जयजयकार करा मी भारत मातेच्या रक्षणासाठी सदैव उभा राहीन. पुण्यापेक्षा पाप वाढला आहे. मानवाला अठरा प्रकारचे आजार पडते. विज्ञानाची प्रगती माणसासाठी घातक ठरेल. मानवाचे आयुष्य कमी होईल बारा वर्षाची मुलगी आई बनेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com