Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेत पुन्हा रस्सीखेच : सभापतीसाठी 'ही' नावे चर्चेत; मुश्रीफ, आबिटकरांची कसोटी

prakash abitkar mushrif politics : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडी झाल्या असून आता सभापती निवडीसाठी इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे.
kolhapur ZP Sabhapati Election politics; prakash abitkar hasan mushrif
kolhapur ZP Sabhapati Election politics; prakash abitkar hasan mushrifsarkarnama
Published on
Updated on
Summary
  • कोल्हापूर जिल्हा परिषद सभापती निवड 30 मार्च रोजी होणार आहे.

  • महायुतीतील विविध पक्षांमध्ये पदवाटपावरून हालचालींना वेग आला आहे.

  • प्रकाश आबिटकर आणि मुश्रीफ यांच्यासमोर योग्य उमेदवार निवडीचे आव्हान आहे.

kolhapur zilla parishad politics : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड पार पडल्यानंतर आता इच्छुकांची सभापती निवडीकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्षामध्ये हालचालीना वेग आला आहे. सोमवारी 30 मार्च रोजी सभापती निवड होणार असल्याने इच्छुकांनी जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांकडे आपले नाव येण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. शिंदेसेना, जनसुराज्य शक्तीला प्रत्येकी दोन तर आमदार यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू आघाडी व राष्ट्रवादीला प्रत्येकी एक सभापतीपद मिळणार आहे.

बांधकाम आणि आरोग्य समिती सभापतिपद हे शिंदेसेनेला गेले आहे. तर शिक्षण व अर्थ समिती सभापतिपद जनसुराज्यला. तसेच आमदार यड्रावकर यांच्या शाहू आघाडीला समाजकल्याण, तर राष्ट्रवादीला समितीचे महिला आणि बालकल्याणचे सभापतिपद मिळणार आहे.

सध्या शिवसेना नेत्यांमध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू आहे. करवीर आणि राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्यांच्या कोणाच्या नावाला पसंती द्यायची याचे डोकेदुखी पालकमंत्री प्रकाश आबिटकर व आमदार चंद्रदीप नरके यांना आहे.

kolhapur ZP Sabhapati Election politics; prakash abitkar hasan mushrif
Kolhapur politics : कोल्हापुरात राजकीय समीकरणे बदलणार? लोकसभेसह विधानसभेच्या जागा वाढणार

बांधकाम आणि आरोग्य समिती सभापतिपदासाठी शिंदेसेनेतच अंतर्गत रस्सीखेच राहणार आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मतदारसंघात हे पद द्यायचे झाल्यास अरुण जाधव, अर्चना निकम आणि सारिका नांदेकर या दावेदार राहतील. तर करवीरमध्ये गेल्यास चंद्रदीप नरके यांच्या इंद्रजित पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या राजकारणात आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्तीच्या सहा जागा निवडून आल्या असल्या तरी सभापती वाटपामध्ये शिक्षण आणि अर्थ समिती सभापती हे महत्त्वाचे खाते आपल्याकडे घेण्यास यशस्वी झाले आहेत. त्यामुळे हे खाते शीतल यादव, सर्जेराव पाटील पेरीडकर, अमरसिंह पाटील या तीन माजी सभापतींपैकी कोणाला संधी मिळते हे पाहावे लागणार आहे. दरम्यान अनिरुद्ध रेडेकर, स्नेहल वेल्हाळ आणि शोभा बेलेकर यांची देखील नावे आघाडीवर असून यांच्यापैकी कोणाला लॉटरी लागणार याकडे देखील लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिला आणि बालकल्याण समितीसाठी अमृता डोंगळे आणि मानसी भोगण आणि राजकुंवर गायकवाड यांची नावे चर्चेत आहेत. मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे चंदगड किंवा शाहूवाडीला न्याय देण्याच्या भूमिकेत असू शकतात. नेता अध्यक्षपदासाठी चर्चेत आलेल्या पूजा दिलीप पाटील यादेखील दावेदार असू शकतात.

मानसी भोगण, विद्या पाटील आणि रचना गावडे यांच्यातून निवड करताना मुश्रीफ यांचीही कसोटी लागणार आहे. समाजकल्याण समितीचे सभापतिपद हे शिरोळ तालुक्याला निश्चित आहे. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडून अमोल चव्हाण, प्रचिता कोळी, श्रद्धा गायकवाड आणि उत्तरा शिंदे यांच्यापैकी कोणाला लॉटरी लागते हे आता पाहावे लागणार आहे.

kolhapur ZP Sabhapati Election politics; prakash abitkar hasan mushrif
Kolhapur Politics : कोल्हापुरात भाजपसाठी विनय कोरेंचा हसन मुश्रीफांशी पंगा : महाडिक विरोध म्हणून एकत्र आलेल्या नेत्यांमध्ये वादाची ठिणगी

FAQs :

1. कोल्हापूर ZP सभापती निवड कधी होणार आहे?
➡️ 30 मार्च 2026 रोजी ही निवड होणार आहे.

2. कोणत्या पक्षांना किती पदे मिळणार आहेत?
➡️ शिंदेसेना व जनसुराज्यला प्रत्येकी 2, तर राष्ट्रवादी व यड्रावकर गटाला प्रत्येकी 1 पद मिळणार आहे.

3. या निवडीला महत्त्व का आहे?
➡️ जिल्हा पातळीवरील सत्तासंतुलन आणि राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होणार आहे.

4. कोणत्या नेत्यांवर निर्णयाची जबाबदारी आहे?
➡️ पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि मुश्रीफ यांच्यावर अंतिम निर्णयाची जबाबदारी आहे.

5. इच्छुक उमेदवार काय करत आहेत?
➡️ वरिष्ठ नेत्यांकडे लॉबिंग करून स्वतःचे नाव पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com