Olympic Association President : 'ज्या' अध्यक्षपदाची धुरा अजित पवारांनी 13 वर्ष सांभाळली, 'त्या'वर आता भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची निवड

Maharashtra Sports Politics : गेल्या वर्षी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत दिवंगत अजित पवार आणि भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आमने-सामने आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
late Deputy CM Ajit Pawar
late Deputy CM Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on
Summary
  • अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षपद रिक्त झाले होते.

  • या पदावर आता मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे.

  • निवडणुकीदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली होती.

Pune News : गेल्या वर्षी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणुक चगलीच गाजली होती. कारण या निवडणुकीमध्ये राज्याच्या महायुती सरकारमध्ये असलेले मित्र पक्ष भाजप आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आमने-सामने आले होते. एकीकडे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार तर दुसरीकडे भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. मात्र यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून वाटाघाटी करत तोडगा काढल्याचे पाहायला मिळाले.

यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी अध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून माघार घेतली आणि ही निवडणूक बिनविरोध झाली. 2013 पासून सलग तब्बल बारा वर्षे अजित पवार हे या संघटनेच्या अध्यक्षपदावरती होते. त्यानंतर गेल्या वर्षी पुन्हा दोन वर्षासाठी अजित पवार यांना अध्यक्ष पद देण्याचं निश्चित करण्यात आलं होतं.

तसेच उपाध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली होती. चार वर्षातल्या कार्य काळामध्ये पहिले दोन वर्ष अजित पवार अध्यक्ष तर दुसरे दोन वर्ष मुरलीधर मोहोळ अधक्ष राहणार असल्याबाबतचा निर्णय झाला होता.

late Deputy CM Ajit Pawar
Ajit Pawar : मिसिंग लिंकचे उद्‌घाटन : पुणे-मुंबई द्रूतगती मार्गावर वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना अजितदादांची आठवण

मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पद रिक्त झालं होतं. त्यामुळे सलग तेरा वर्ष अजित पवार ज्या असोसिएशनच्या अध्यक्षपदी राहिले त्या ठिकाणी आता अध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे.

मात्र अजित पवार कार्यकाळ पूर्ण करू न शकल्याने त्यांच्याठिकाणी इतर कुठल्या राष्ट्रवादीच्या नेत्याला या ठिकाणी संधी दिली जाणार का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं मात्र तसं न झाल्याच पाहायला मिळत आहे.

नुकतीच महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनची कार्यकारणीची बैठक व सर्वसाधारण सभा संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शिवछत्रपती स्टेडीयम बालेवाडी येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांची सर्वानुमते महाराष्ट्र ऑलिंपिक असोससिएशनचे अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली असल्याचं सांगितलं सांगण्यात आला आहे.

late Deputy CM Ajit Pawar
Sunetra Pawar यांनी Katewadi मतदान केंद्रावर केलं मतदान। Baramati , Ajit Pawar

FAQs :

1. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे नवे अध्यक्ष कोण आहेत
मुरलीधर मोहोळ यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे

2. हे पद रिक्त का झाले होते
अजित पवार यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते

3. निवडणुकीत कोणते नेते आमने-सामने होते
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमने-सामने होते

4. या प्रक्रियेत मध्यस्थी कोणी केली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली होती

5. या बदलाचा काय परिणाम होऊ शकतो
क्रीडा संघटनेच्या धोरणांमध्ये आणि नेतृत्वात बदल होऊ शकतो

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com