Kolhapur: भाजप नेत्याला आमदार करण्यासाठी शिवसेना खासदाराची धडपड : थेट अमित शाहंकडे लावली फिल्डिंग

Ichalkaranji Politics, Dhiryashil Mane, Suresh Halvankar: इचलकरंजीतील राजकारण तापले असून खासदार धैर्यशील माने यांनी अमित शाहांसमोर सुरेश हळवणकर यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची मागणी केली. यामुळे भाजप अंतर्गत राजकीय चर्चा वाढल्या.
Suresh Ganpati Halvankar
former MLA Suresh Halvankar Sarkarnama
Published on
Updated on

Ichalkaranji Politics: केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आमदार राहुल आवाडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार धैर्यशील माने यांनीच बाजी मारली. थेट केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा दाखला देत आता इचलकरंजीमध्ये आता विधानपरिषदेचा आमदार द्यावा अशी मागणी करत संपूर्ण सभेचं मार्केट मिळवलं. भल्या व्यासपीठावरून खासदार माने यांनी केलेली मागणी माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्याबाबत असल्याने इचलकरंजीच्या राजकारणात वेगळीच चर्चा पाहायला मिळाली.

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांना विधानपरिषदेवर घेण्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली आहे. अशातच विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये राहुल आवाडे यांनी पक्षप्रवेश करून बाजी मारली. मात्र सुरेश हळवणकर यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानपरिषदेवर घेण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर राज्यपाल कोट्यातील आमदारांच्या यादीत सुरेश हळवणकर यांचे नाव येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्या ठिकाणी हळवणकर यांचा नंबर न लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये धुसफुस होती.

Suresh Ganpati Halvankar
Parbhani-Hingoli MLC Election 2026 : पक्षांतर्गत विरोधानंतरही उमेदवारीसाठी माजी आमदाराचे राष्ट्रवादीशीही संधान? महायुतीत खळबळ

हाच धागा पकडत इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजीतील मेळाव्यात केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या समोरच माजी आमदार सुरेश हळवणकर यांची कैफियत मांडली. लोकसभा निवडणुकीत इचलकरंजीवासीयांना धैर्यशील माने यांना मतदान करण्यासाठी तुम्हीच सुचवले होते. शिवाय विधानसभा निवडणुकीत देखील आमदार राहुल आवाडे यांना विजयी करण्यासाठी मतदान करण्याची विनंती आपण केली होती. तुमच्या विनंतीला मान देऊन इचलकरंजीवासी यांनी मला व आमदार आवाडे यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयी केले.

आता माजी आमदार सुरेश हळवणकर यांना विधानपरिषदेवर संधी द्या. अशी मागणी व्यासपीठावरून खासदार धैर्यशील माने यांनी केली. माने यांच्या या मागणीनंतर मात्र इचलकरंजीच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत माजी आमदार हळवणकर गटाला डावलले असा आरोप कार्यकर्त्यांनी केला होता. शिवाय महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील हळवणकर आणि आवाडे गटांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू होता. अशातच खासदार धैर्यशील माने यांनी केलेली मागणी चर्चेची विषय बनली आहे.

Suresh Ganpati Halvankar
Nashik MLC Election : तर शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप भुजबळांच्या पसंतीचा उमेदवार देणार, नाशिकच्या रणधुमाळीतील पडद्याआडची गोष्ट

पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा पहिला आमदार

दरम्यान काँग्रेस सरकारच्या आणि आघाडी सरकारच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात पहिला भाजपचा आमदार म्हणून माजी आमदार सुरेश हळवणकर यांची ओळख आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजप पहिल्यांदा फुलवण्याचं काम हळवणकर यांनी केलेले आहे. त्यामुळेच आज पक्षाला चांगले दिवस आहेत. पक्षाशी प्रामाणिक आणि निष्ठावंत म्हणून हळवणकर यांची ओळख आहे. असा दाखला देखील खासदार धैर्यशील माने यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com