Miraj Banner Controversy : दोन्ही शिवसेनेतील वाद कमानींवर उमटला, दिशा सालियन प्रकरण झळकताच ‘गद्दारी’ने प्रत्‍युत्तर...

Shiv Sena Uddhav Thackeray faction Miraj controversy : मिरजेत शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील वाद कमानीवरील बॅनरमधून समोर आला आहे. दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख झाल्यानंतर ‘गद्दारी’च्या बॅनरने प्रत्युत्तर देण्यात आले.
Miraj Banner Controversy : दोन्ही शिवसेनेतील वाद कमानींवर उमटला, दिशा सालियन प्रकरण झळकताच ‘गद्दारी’ने प्रत्‍युत्तर...
Sarkarnama
Published on: 
Updated on: 

मिरजेतील गणेशोत्सवातील स्वागत कमानी यंदा पुन्हा एकदा राजकीय चर्चेचा विषय ठरल्या आहेत. शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाने एकमेकांना प्रत्युत्तर देणाऱ्या कमानी उभारल्याने गणेशोत्सवाच्या वातावरणात राजकीय संघर्षाचे चित्र पाहायला मिळत आहे. शिंदे गटाच्या कमानीवर दिशा सालियन आणि अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे.

त्याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील खंडोजी खोपडे प्रकरणाचा संदर्भ देत ‘गद्दारांना क्षमा नाही’ असा संदेश दिला आहे. या दोन्ही कमानींना प्रशासनाची परवानगी असल्याचे वृत्त आहे. मिरजेतील अनंतचतुर्दशीची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडते.

Miraj Banner Controversy : दोन्ही शिवसेनेतील वाद कमानींवर उमटला, दिशा सालियन प्रकरण झळकताच ‘गद्दारी’ने प्रत्‍युत्तर...
Maharashtra drought : राज्यात दोन टप्प्यांत दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता : पहिल्या टप्प्यातील 139 पात्र तालुक्यांची यादीच समोर

मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक शहरात दाखल होतात. स्टँड परिसरापासून लक्ष्मी मार्केट आणि पुढे गणेश तलावापर्यंत स्वागत कमानी उभारण्याची परंपरा आहे. गणेश मंडळांचे स्वागत करण्यासोबतच या कमानींच्या माध्यमातून सामाजिक किंवा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो.

यंदा मात्र दोन शिवसेना गटांमधील राजकीय संघर्ष या कमानींमधून थेट समोर आला आहे. शिंदे गटाच्या कमानीवर दिशा सालियन आणि सुशांतसिंग राजपूत यांचे छायाचित्र वापरून ठाकरे गटावर राजकीय निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे वृत्त आहे. दिशा सालियन प्रकरणावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले जात असले तरी त्यांच्या समर्थकांकडून आरोप फेटाळण्यात आले आहेत.

याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाच्या कमानीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडोजी खोपडे यांना दिलेल्या शिक्षेचे प्रतीकात्मक चित्र साकारण्यात आले आहे. त्यासोबत ‘स्वराज्यात गद्दाराला क्षमा नाही’ असा मजकूर वापरण्यात आला आहे. त्यामुळे ही कमान शिंदे गटाच्या भूमिकेला दिलेले राजकीय प्रत्युत्तर मानली जात आहे.

Miraj Banner Controversy : दोन्ही शिवसेनेतील वाद कमानींवर उमटला, दिशा सालियन प्रकरण झळकताच ‘गद्दारी’ने प्रत्‍युत्तर...
Aditya Thackeray : आदित्य ठाकरे उद्यापासून शेतकऱ्यांच्या बांधावर; मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत दोन दिवस दुष्काळ पाहणी

विशेष म्हणजे दोन्ही कमानींवरील मजकूर आणि मांडणीला पोलिस प्रशासनाची परवानगी मिळाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरजेत शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटातील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. कमानींवरील या शाब्दिक आणि प्रतीकात्मक राजकीय वार-प्रतिवाराची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com