NCP News: राजीनामा मागितलेल्या राष्ट्रवादीच्या आमदाराकडे नवी जबाबदारी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर दिली माहिती

Idris Naikwadi, Parth Pawar, NCP Anniversary: आमदार इद्रीस नाईकवडी यांनी पार्थ पवार यांनी राजीनामा मागितल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. कोणत्याही नेत्याने राजीनामा मागितला नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी पक्षकार्यावर भर दिला.
Idris Naikwadi
Idris Naikwadisarkarnama
Published on
Updated on

Idris Naikwadi: "पार्थ पवार यांनी माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा राजीनामा मागितलेला नाही. शिळ्या कडीला आणखी किती उकाळा द्यायचा? त्यामुळे ही चर्चा आता थांबवा. जर तर च्या विश्वासावर मी कधीही राजकारण करत नाही. राजीनाम्याचा विषय कधीच चर्चेत नाही. कोणत्याच नेत्यांनी आणि मंत्र्यांनी माझ्याकडे राजीनामा मागितला नाही." अशी स्पष्टोक्ती विधान परिषदेचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार इद्रीस नाईकवडी यांनी केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीदरम्यान ते बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार यांनी आपले ओएसडी यांच्यामार्फत सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार इद्रीस नाईकवडी यांचा राजीनामा मागितल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरू होती. मात्र राजीनामा देण्यास आमदार नाईकवडी यांनी नकार दर्शवला होता. लवकरच आपण त्या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याचं जाहीर केले होते.

Idris Naikwadi
Dhananjay Munde News: धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवाहात लवकरच पुन्हा धडाक्यात एन्ट्री? सुनेत्रा पवार मोठी संधी देण्याच्या तयारीत

दरम्यान येत्या ११ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार ईद्रीस नाईकवडी यांनी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान राजीनाम्या संदर्भात महत्त्वाची माहिती आज इद्रीस नाईकवडी यांनी दिली. माझ्याकडे कोणीही राजीनामा मागितला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त माझ्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मी संघटनात्मक आणि पक्षात काम करणारा कार्यकर्ता असल्याचे इद्रीस नाईकवडी यांनी म्हटले आहे.

Idris Naikwadi
NCP Leader resignation: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी विधानपरिषदेची उमेदवारी नाकारली : ठाण्यातील बड्या नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम

११ जूनला राष्ट्रवादीचा वर्धापन दिन असल्याने ,नियोजनानुसार माझ्याकडे काही काम किंवा जबाबदारी आलेली आहे. त्यासंदर्भात मी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यापूर्वीही मी उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांची भेट घेतलेली आहे. दिवंगत नेते अजित पवार यांनी पक्षांमध्ये काही शिस्त लावलेले आहे. येत्या ११ जूनला पक्षाचा वर्धापन दिन आहे. नियोजनानुसार काही कामे वाटून घेण्याची पद्धत आमच्या पक्षात आहे. असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com