Rohit Patil On Jayant Patil : रोहित पाटलांचा जयंतरावांना जाहीर शब्द; ‘तुमच्या शब्दाच्या पुढे एकजणही जाणार नाही...’

Sangli zilla Parishad President : सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीची हालचाल सुरू केली. आमदार रोहित पाटील यांनी सदस्यांची निष्ठा जाहीर करत जयंतरावांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भूमिका घेतली आहे.
Rohit Patil - Jayant Patil
Rohit Patil - Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli, 19 February : साताऱ्यानंतर सांगलीतही जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. मात्र, माजी मंत्री जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यादृष्टीने पक्षाचे नेते मंडळी, आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांची सांगलीत बैठक झाली, त्या बैठकीत आमदार रोहित पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांना शब्द दिला आहे. साहेब तुम्ही करेक्ट कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आहात, सांगलीतही ते करतील. तुमच्या शब्दाच्या पुढे आमचा एकही जिल्हा परिषद सदस्य जाणार नाही, असे सांगून झेडपीतील सत्तास्थापनेत जयंतरावांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका आमदार पाटील यांनी मांडली.

सांगली जिल्हा परिषदेच्या (Sangli Zilla Parishad) निवडणुकीत सर्वाधिक १८ जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिंकल्या आहेत, तर महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या ११ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक अशा एकूण ३० जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानंतर भाजपने १६ जिंकल्या आहेत. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसने ०६, शिंदेसेनेने ०७, रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्य पक्षाने प्रत्येकी एक जागेवर विजय मिळविला आहे. त्यामुळे महायुतीकडे ३१ इतके संख्याबळ होते.

सत्ता स्थापनेइतके संख्याबळ कोणत्याही एका पक्षाकडे नाही, त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. सांगली जिल्हा परिषद निवडणूक भाजपने (BJP) स्वबळावर लढवली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदसेनेसोबत युती केली नव्हती, त्यामुळे हे दोन्ही पक्ष कोणती भूमिका घेतात, यावर बरेच गणिते अवलंबून आहेत.

दरम्यान, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्या अनुषंगानेच सांगलीत पक्षाचे नेते, आमदार आणि सदस्यांची एक बैठक झाली. त्या बैठकीत आमदार रोहित पाटील यांनी रोखठोक भूमिका मांडली. तसेच, माजी मंत्री जयंत पाटील यांना झेडपीतील सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेण्याचेही आवाहन केले.

Rohit Patil - Jayant Patil
Satara ZP President : सातारा ZP साठी भाजपचे नवे डावपेच; शिवेंद्रराजेंवर मोठी जबाबदारी, वरिष्ठ पातळीवर ठरणार रणनीती

रोहित पाटील म्हणाले, मला पक्षाचा मुख्य प्रतोद करताना तुम्ही सांगाल तिथं सही करण्याचा शब्द दिला होता. तसाच शब्द जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करत असतानासुद्धा मी माझ्या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका मांडतोय. तुमच्या शब्दाच्या पुढे माझ्या मतदारसंघातील एकही जिल्हा परिषद सदस्य जाणार नाही, असा शब्द देतो.

Rohit Patil - Jayant Patil
Chhagan Bhujbal : "भुजबळ विमानात बसले, दोन्ही इंजिन सुरु झाले अन् अचानकच..." स्वतःच सांगितला थरारक प्रसंग

तुमच्या नेतृत्वावर मला विश्वास आहे. सांगली जिल्हा परिषदेत आपण सरकार स्थापन करू, हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. गणित घालण्यात आणि करेक्ट कार्यक्रम करण्यात तुम्ही हुशार आहात. त्यामुळे तुम्ही करेक्ट कार्यक्रम कराल, अशी आशा आम्हा सर्वांना आहे, असेही रोहित पवार यांनी जयंतरावांना बोलून दाखवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com