Bhor Politic's : थोपटे-मांडेकरांची प्रतिष्ठा पुन्हा पणाला : सभापतिपदासाठी फोडाफोडी की पुन्हा ईश्वरी चिठ्ठी?

Bhor Panchayat Samiti Sabhapati : भोर पंचायत समितीत भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी चार सदस्य निवडून आल्याने सभापती निवडणूक चुरशीची ठरली आहे. समान मते पडल्यास चिठ्ठीद्वारे निर्णय होण्याची शक्यता आहे.
Sangram Thopte-Shankar Mandekar
Sangram Thopte-Shankar MandekarSarkarnama
Published on
Updated on

Pune, 28 February : भोर पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदाची निवड येत्या नऊ मार्चला होणार आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत मतदारांनीही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी चार सदस्य निवडून दिले आहेत. दोन्ही पक्षाचे समान संख्याबळ झाल्याने सभापती कोणाचा होणार, याकडे संपूर्ण भोर तालुक्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे आमदार शंकर मांडेकर आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सभापतिपदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समान मते पडल्यास ईश्वर चिठ्ठीद्वारे सभापती (Sabhapati) निवडला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे सभापतिपद कोणत्या पक्षाच्या पारड्यात पडणार, समान मतदान झाल्यावर कोणाची चिठ्ठी निघणार की काही वेगळी खेळी होते, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

नऊ वर्षांनंतर पंचायत समितीची निवडणूक झाली असून गेल्या चार वर्षांपासून पंचायत समितीवर प्रशासकराज होते. मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता होती. परंतू यावेळी मतदारांनी कोणत्याच एका पक्षाला बहुमत न देता समान संधी दिली आहे. त्यामुळे समान संख्याबळ असल्याने भोरच्या (Bhor) राजकारणात सभापतिपदासाठी चिठ्ठीद्वारे नशिब अजमावण्यात येणार आहे.

भोरचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी आहे. आठ सदस्यांपैकी चार महिलांच्या जागेवर तीन सर्वसाधारण व एक ओबीसी आरक्षणातून महिला निवडून आल्या आहेत. यात राष्ट्रवादीच्या दोन आणि भाजपच्या दोन महिला सदस्य निवडून आल्या आहेत. इतर चार ठिकाणी निवडून आलेल्या पुरुषांमध्ये दोन राष्ट्रवादी व दोन भाजपचे सदस्य आहेत.

Sangram Thopte-Shankar Mandekar
Karad News : कराडच्या नगराध्यक्षांचा ऐतिहासिक निर्णय; पहिली अर्थसंकल्पीय सभा थेट यशवंतरावांच्या चरणी....

निवडून आलेल्या महिला सदस्य तृप्ती खुटवड आणि गीता आंबवले या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. मनिषा कंक व सुषमा चव्हाण या प्रथमच निवडणुकीला सामोरे गेल्या होत्या. यातील आंबवले या ओबीसी महिला आरक्षण गणातून तर इतर तीनही सदस्य सर्वसाधारण महिला आरक्षणाच्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.

या चार महिला सदस्यांपैकी एका सदस्याची सभापतिपदी निवड होणार आहे. त्यामुळे पक्ष कोणाला संधी देणार आणि त्यातून कोणाच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडते, हे येणारा काळच ठरवणार आहे. मात्र, सभापती निवडीबाबतच्या झालेल्या पेचाबाबत तालुक्यात चर्चा आहे. नुकत्याच भोर नगरपरिषद नगरसेवक पदाच्या निवडणुकीत दोन उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे विजयी उमेदवार निवडण्यात आला होता.

समान मते पडल्यास चिठ्ठी

प्रथमतः सभापतिपदासाठी निवडणूक घेतली जाईल. या निवडणुकीतील उमेदवारांना समान मते पडल्यास ईश्वर चिठ्ठीद्वारे सभापतिपदाची निवड केली जाईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Sangram Thopte-Shankar Mandekar
Dharashiv ZP president race: एकनाथ शिंदेंचा भाजपला दणका, आता माघार नाहीच! सत्तेसाठी 'हा' फॉर्म्युला पाळा! धाराशिव 'झेडपी'मध्ये मोठा ट्विस्ट

या आहेत सभापतिपदाच्या दावेदार

- तृप्ती खुटवड (कामथडी, राष्ट्रवादी)

- मनीषा कंक (शिंद, राष्ट्रवादी)

- सुषमा चव्हाण (उत्रौली, भाजप)

- गीता आंबवले (कारी, भाजप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com