Pune Graduate Election: काँग्रेसच्या नगरसेवकाला ठाकरेंच्या शिवसेनेकडून पदवीधरचे तिकीट, उद्धव ठाकरेंच्या अजब कारभारामुळे राजकीय भुवया उंचावल्या

Shiv Sena UBT has nominated Congress-backed Kolhapur corporator Sunil Modi: पुणे पदवीधर निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोल्हापूरचे स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी यांना उमेदवारी देण्यात आली. या निर्णयामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी आणि संभ्रम असल्याची चर्चा आहे.
shivsena UBT Sunil Modi
shivsena UBT Sunil Modi sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune Graduate Election: पुणे पदवीधर निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या अजब कारभाराची चर्चा सध्या कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात सुरू आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत भारतीय काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर स्वीकृत नगरसेवक झालेले सुनील मोदी यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुणे पदवीधर निवडणुकीतील अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.

पक्षाचे सचिव अनिल देसाई यांच्याकडून अधिकृत एबी फॉर्म जारी केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा निष्ठावंत शिवसैनिक हा वाऱ्यावर सोडल्याची भावना शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहे.

आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुणे पदवीधरमध्ये नगरसेवक सुनील मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महापालिका निवडणुकीत मिळालेल्या अपयशाला नगरसेवक मोदी हे जबाबदार असल्याचे अनेक वेळा शिवसैनिकांनी जाहीरपणे सांगितले आहे. शिवाय काँग्रेसकडून महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवड झालेल्या पदाधिकारी निवडीत शहर प्रमुख विशाल देवकुळ यांनी मोदी यांच्या घरासमोर जाऊन राडा केला होता.

shivsena UBT Sunil Modi
MLC Election 2026 : भाजपच्या मित्रपक्षाचे चारच आमदार, शिक्षक निवडणुकीसाठी तिघांचे बंड ; अध्यक्षांसोबत उरल्या केवळ आमदार पत्नी

दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून पदाधिकारी बदलण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा पक्षाला ऊर्जित स्वरूप प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत होणाऱ्या पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमाला मोदी यांची अनुपस्थिती चर्चेत राहीली आहे.

shivsena UBT Sunil Modi
Gokul election : गोकुळच्या पत्रकावरून महायुतीत ठिणगी; शौमिका महाडिकांचा हसन मुश्रीफांना टोला, महादेव जानकरांनाही सुनावलं

"रस्त्यावर आंदोलन करायला शिवसैनिक आणि लाभ घ्यायला मोदी" असे जाहीरपणे शिवसैनिक सांगत आहेत. ठाकरेंच्या सेनेकडून नेहमीच मोदींवर कृपादृष्टी दाखवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पुणे पदवीधर निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com