Madha Loksabha 2024 : '...म्हणून माढ्याच्या खासदारांना आता घरचा रस्ता दाखवा!'; रासपच्या नेत्यानं फुंकलं रणशिंग

MP RanjitSinh Nimbalkar Political News : भाजपच्या राजकारणाला जनता कंटाळली असून माढ्यातही परिस्थिती काही वेगळी नाही.
Ranjitsinh Naik Nimbalkar
Ranjitsinh Naik Nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

Madha Politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर हे माढ्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर रासपकडून माढा मतदारसंघात घोंगडी बैठकांचा धडाका सुरू करण्यात आला आहे. या बैठकीदरम्यान रासपने माढ्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

माढ्याच्या खासदाराला निवडणुकीनंतर पुन्हा आपली गावं दिसली नसल्याची टीका रासपचे(RSP) युवकचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित पाटील यांनी केली आहे. त्यामुळे मतदारांनी आता अशा खासदाराला आता घरचा रस्ता दाखवावा असा घणाघात पाटील यांनी केला आहे.

Ranjitsinh Naik Nimbalkar
Mamata Banerjee : लोकसभेपूर्वीच ममतादीदींनी पेटवला मोठा मुद्दा; थेट नरेंद्र मोदींना अल्टिमेटम !

पाटील म्हणाले, माढा मतदारसंघातील सातारा जिल्ह्यातल्या माण खटाव मध्ये पाण्यासह उद्योग, रोजगार, शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे म्हणून येथील जनतेने मोठे आशेने रणजीत निंबाळकर (Ranjitsinh Nimbalkar) यांना लोकसभेत पाठवले. मात्र, ज्यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं त्या खासदारांनी निवडणुका झाल्यावर पुन्हा कधीच कोणत्या गावात पाऊल ठेवले नाही. माण खटावमधील लोकांनी निवडणुकीनंतर पुन्हा खासदाराच तोंडच पाहिले नाही, असा आरोप केला जात आहे.

त्यामुळे आता अशा खासदाराला पुन्हा का मतदान करावे असा सवाल जनता विचारत असल्याची टीका पाटील यांनी निंबाळकरांचे नाव न घेता केली. ते खटाव येथे आयोजित घोंगडी बैठकीत बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माण-खटाव तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नावर निवडणुका आल्या की राजकारण केले जाते. मात्र आजही या तालुक्यातील गावागावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या तशाच प्रलंबित आहेत. शेतीच्या पाण्याचा पश्न तर चर्चेत देखील येत नाही. मात्र आता निवडणुका आल्या की पुन्हा आम्ही निळवंडेचे पाणी देऊ, योजना मंजूर झाली आहे, अशा प्रकारे आश्वासनांची खैरात सुरू करण्यात आली आहे. मात्र हे पाण्याचे राजकारण करणारे हे लोकप्रतिनिधी जनतेची फसवणूक करत असल्याची टीकाही अजित पटील यांनी केली.

देशात नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) आश्वासनाला भुलून जनतेने भाजपला मतदान केले. मात्र आज जनता पश्चाताप करत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, शेती मालाला दर मिळत नाही, दुधाला दर नाही. शेतकरी प्रचंड अडचणीतून शेती करत आहे. कापसाला यापू्वी दहा हजार दर मिळत होता आता तो सहा हजारावर आला आहे. म्हणजे या सरकारने शेतकऱ्यांना द्यायचे सोडले; जे मिळत होते त्यातही पैसे हाणले असल्याचा आरोप पाटील यांनी भाजप सरकारवर केला.

तसेच केंद्रीय तपास यंत्रणाचा धाक दाखवून विरोधकांना पक्ष प्रवेश दिला जात आहे. विरोधक कमकुवत असेल तर जनतेला न्याय मिळणार कसा? असा सवालही पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

Ranjitsinh Naik Nimbalkar
Devendra Fadnavis News : फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट माजी नगरसेवकाला भोवणार

माढ्यात महादेव जानकर सक्षम पर्याय

भाजपच्या राजकारणाला जनता कंटाळली असून माढ्यातही परिस्थिती काही वेगळी नाही. त्यामुळे माढ्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायला रासपचे नेते महादेव जानकर हे सक्षम पर्याय असल्याचे मतही पाटील यांनी व्यक्त केले आहे. पाटील म्हणाले की राष्ट्रीय समाज पक्ष येणारी माढा लोकसभा निवडणूक महादेव जानकरांच्या विजयासाठीच लढणार आहे. त्यासाठी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून गावां-गावामध्ये जाऊन लोकांसमोर आमची भूमिका मांडण्याचे काम आम्ही करत आहोत.

महादेव जानकर (Mahadev Jankar) हे मंत्री असताना त्यांनी मराठवाड्याच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यासाठी मागास जिल्हा म्हणून विशेष पॅकेजची तरतूद केली होती. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य दर मिळावा म्हणून दुधाला लिटरला पाच रुपये एकाच वेळी सरसकट अनुदान जाहीर केले होते. दु्ष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या पशूधनासाठी चारा छावण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले. देशातील पहिली शेळ्या-मेंढ्यांची चारा छावणी त्यांनी खटाव तालुक्यामध्ये सुरू केली होती.

Ranjitsinh Naik Nimbalkar
Mahadev Jankar News : महादेव जानकर टाकणार नवा डाव; आघाडी अन् युतीचा खेळ बिघडवणार

तसेच या राज्यात मंत्री म्हणून काम करत असताना सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाच्या पाण्यासाठी नेहमीच आक्रमकपणे बाजू मांडण्याचे काम त्यांनी केले होते. त्यामुळे आता माढा मतदारसंघातील जनता आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी परिवर्तन आणि बदल होणे आवश्यक आहे. त्यासाठी सक्षम पर्याय म्हणून महादेव जानकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन पाटील यांनी जनतेला केले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Ranjitsinh Naik Nimbalkar
Maratha Reservstion : 'आधी फडणवीसांनी अन् आता शिंदेंनी मराठा समाजाला..' ; रावसाहेब दानवेंचं विधान!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com