Solapur Lok Sabha : सातपुतेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता ; ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडिओचा अहवाल कलेक्टर निवडणूक आयोगाला पाठवणार

Solapur Collector PC : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यातून आचारसंहिता भंगाच्या एकूण 166 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
Ram Satpute-Kumar Ashirwad
Ram Satpute-Kumar AshirwadSarkarnama

Solapur, 23 April : पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी सोलापूरमधील मस्जिदीमधून फतवे निघत आहेत, असा गंभीर आरोप सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी केला होता. त्याबाबत आलेल्या तक्रारींनुसार सातपुते यांच्या त्या आक्षेपार्ह व्हिडिओचा अहवाल केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती सोलापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

आमदार राम सातपुते (Ram satpute) यांनी काही दिवसांपूर्वी ‘मोदींना पाडण्यासाठी सोलापूरच्या मस्जिदीमधून फतवे निघत आहेत,’ असा आरोप केला होता. त्यावरून काँग्रेस आणि विरोधी पक्षाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला होता. त्यावरून आरोप-प्रत्यारोपही रंगला होता. सातपुते यांच्या त्या आरोपाबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (Kumar Ashirwad) यांच्याकडे दोन तक्रारी दाखल झाल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ram Satpute-Kumar Ashirwad
Vanchit Aghadi News : ‘सोलापूरच्या उमेदवाराने वंचित आघाडीला धोका दिला, गद्दारी केली’

निवडणूक कक्षाकडे दाखल झालेल्या तक्रारींची दखल घेऊन आमदार सातपुते यांचा तो व्हिडिओ पाहून त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. तो अहवाल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

काय म्हणाले होते सातपुते?

सोलापूरमध्ये ‘एमआयएम’ने उमेदवार दिलेला नाही. कारण, काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत आणि मोदींना पाडण्याबाबत मस्जिदीमधून फतवे निघत आहेत, त्याचा मी निषेध करतो. सोलापुरात मोदींना पाडण्यासाठी मौलवी दारोदारी वेगवेगळी पत्रकं वाटप करत फिरत आहेत. उर्दू भाषेतील पत्रकं घराघरांत जात आहेत. मस्जिदीतून फतवे काढून संविधानाला खुलं आव्हान देण्याचे काम काँग्रेसचे लोक करत आहेत, असा आरोप सोलापूर मतदारसंघाचे भाजप उमेदवार राम सातपुते यांनी केला होता.

Ram Satpute-Kumar Ashirwad
Mohol Assembly : काँग्रेस विचारांच्या मोहोळमध्ये यंदा कमळ फुलेल का?

आचारसंहिता भंगाच्या 166 तक्रारी

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यातून आचारसंहिता भंगाच्या एकूण 166 तक्रारी दाखल झाल्या आहेत. आयोगाच्या सी व्हिजिल ॲपवर 152, तर ऑफलाईन 14 तक्रारी मिळालेल्या आहेत, त्यापैकी 70 तक्रारींमध्ये काही प्रमाणात तथ्य आढळल्याने त्यावर कारवाई केली आहे.

Ram Satpute-Kumar Ashirwad
Sangli Lok Sabaha 2024 : सांगलीतील काँग्रेस नेते शिवसेनेचे चंद्रहार पाटलांच्या प्रचारात उतरणार का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com