Sangli Udta Punjab : सांगलीचा उडता पंजाब करणाऱ्या ‘नशिल्या इंजेक्शन्स’चे कनेक्शन उत्तर प्रदेशपर्यंत; आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Sangli Drug Injection Racket : सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले असून नशिल्या इंजेक्शनचे रॅकेट उघड झाले आहे. याप्रकरणी तपासाची चक्रे गतिमान झाली असून नशिल्या इंजेक्शनप्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
Sangli Drug Injection Racket
Sangli Drug Injection RacketSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : नशिल्या इंजेक्शनप्रकरणात मिरज पोलिस पथकाला मोठे यश आले असून उत्तर प्रदेश कनेक्शन उघड झाले आहे. याच्याआधी एमडी ड्रग्ज प्रकणात मुंबई आणि गुजरातचे कनेक्शन उघडे झाले होते. यानंतर आता नशिल्या इंजेक्शनप्रकरणी उत्तर प्रदेश कनेक्शन उघड झाले आहे. इंजेक्शनचा वितरण करणारा मुख्य संशयित आरोपी खलीलपूरचा (जि. मुरादाबाद, उत्तर प्रदेश) असल्याचे उघड झाले आहे. याचे नाव इंतजार अली जहीरुद्दीन (वय 25) आहे. तर हा सांगलीसह अन्य जिल्ह्यांत कुरिअरच्या माध्यमातून इंजेक्शन पुरवत असल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, महात्मा गांधी पोलिसांनी थेट उत्तर प्रदेशमध्ये कारवाई करत नशाबाजाराला मोठा शटका देत आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या छापेमारी मारीत आतापर्यंत 13 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

सध्या जिल्ह्यात एमडी ड्रग्ज आणि नशिल्या इंजेक्शनप्रकरणी ‘सांगलीचा उडता पंजाब करायचा आहे का’, असा सवाल नागरीक करतायत. यानंतरच पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी नशाखोरीचा बाजार उखडून टाकण्यासाठी मोहिम होती घेतली. सांगली शहरात वैद्यकीय वापरासाठी असणाऱ्या मेफेटर्माइन या इंजेक्शनचा वापर नशेसाठी होत असल्याचे उघड झाले.

Sangli Drug Injection Racket
Sangli MD Drugs Case : विटा एमडी ड्रग्ज प्रकरणात एलसीबीची धडक कारवाई; मालकीणीला ठोकल्या बेड्या; पानटपऱ्यांवरही हातोडा

यानंतर याचा तपास अधिक गतीने करताना, इंजेक्शनची तस्करी करणारा एक जण सांगली येणार असल्याची माहिती महात्मा गांधी पोलिसांना मिळाली. त्यापद्धतीने छापा टाकून संशयितांना अटक केली असता संशयीत तिघांना अटक करण्यात आली होती. सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या तिघांनाकडून 15 लाख रुपयांचे 1 हजार 500 मेफेटर्माइन इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला होता.

दरम्यान, आता याची पाळेमुळे खणण्याचे आदेश अधीक्षक संदीप घुगे यांनी दिल्याने पथकाकडून कसून चौकशी आणि छापेमारी केली जातेय. सोलापुरातही याप्रकरणी छापेमारी करण्यात असून येथे इंजेक्शन विक्री झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आता सातारा, सोलापूर, कोल्हापूर येथील तीन एजंटांना ताब्यात घेण्यात आले.

Sangli Drug Injection Racket
Sangli Drugs Case : सांगलीत एमडी ड्रग्जची पाळेमुळे खोलवर? मुंबई, गुजरातपर्यंत कनेक्शन; संशयित एजंट रडारवर

त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता मुरादाबाद येथील इंतजार जहीरुद्दीन याचे नाव उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथे जाऊन जहिरुद्दीन याला ताब्यात घेतले. ट्रान्झीट रिमांड घेऊन त्याला सांगलीत आणण्यात आले. त्याने इंजेक्शन पुरवत असल्याची कबुली दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com