Sangli Mayor : भाजपच्या 2 आमदारांवर भारी ठरले 'प्रदेश उपाध्यक्ष' : सांगलीच्या महापौरपदासाठी वसंतदादांच्या सुनेचाही आग्रह नाही चालला

Sangli Mayor : सांगली महापालिकेत भाजपने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्ता राखली आहे. धीरज सूर्यवंशी यांना महापौरपदासाठी तर गजानन मगदूम यांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी देऊन भाजपने सत्तेचे नवे समीकरण जुळवून आणले आहे.
Guardian Minister Chandrakant Patil announcing the Mahayuti alliance's candidates, Dheeraj Suryavanshi (BJP) for Mayor and Gajanan Magdum (NCP) for Deputy Mayor, at a high-level meeting in Sangli.
Guardian Minister Chandrakant Patil announcing the Mahayuti alliance's candidates, Dheeraj Suryavanshi (BJP) for Mayor and Gajanan Magdum (NCP) for Deputy Mayor, at a high-level meeting in Sangli.Sarkarnama
Published on
Updated on

Sangli Mayor : सांगली महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून धीरज सुर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीने गजानन मगदूम यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. महापालिका निवडणुकीत भाजपला काठावरचे बहुमत मिळाले असून मॅजिक फिगर गाठण्यासाठी राष्ट्रवादीची मदत घेतली आहे. या सत्ता वाटपामध्ये महापौरपद स्वतःकडे ठेवत भाजपने उपमहापौरपद राष्ट्रवादीला दिले आहे.

धीरज सुर्यवंशी हे मागील अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असून त्यांच्या उमेदवारीतून निष्ठावंताला संधी दिल्याचे सांगितले जाते. सुर्यवंशी यांची नगरसेवक म्हणून तिसरी टर्म आहे. यापूर्वी त्यांनी उपमहापौरपद म्हणून काम केले आहे. याचबरोबर स्थायी सभापती म्हणून सुद्धा त्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. गतवेळी सुर्यवंशी यांचा महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव झाला होता. आता यंदाच्या निवडणुकीत सुर्यवंशी यांनी भाजपाचे ८ नगरासेवक निवडून आणण्यात मोलाची भूमिका निभावली होती. त्यामुळेच त्यांना संधी देण्यात आली असण्याची शक्यता आहे.

शेखर इनामदार यांच्या गटाला संधी :

धीरज सुर्यवंशी यांना संधी देत चंद्रकांत पाटील यांनी प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या गटाला संधी दिल्याचे दिसून येते. भाजपचे सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचा महापौरपदासाठी अतुल माने यांच्या नावाचा आग्रह धरला होता, तर नव्याने भाजपमध्ये आलेल्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी रोहिणी पाटील व संतोष पाटील यांचे नाव पुढे केले होते. तर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार हे धीरज सुर्यवंशी यांच्यासाठी आग्रही होते.

Guardian Minister Chandrakant Patil announcing the Mahayuti alliance's candidates, Dheeraj Suryavanshi (BJP) for Mayor and Gajanan Magdum (NCP) for Deputy Mayor, at a high-level meeting in Sangli.
Shivsena Politics : 'तुमचा मुख्यमंत्री आमच्यामुळे, त्यांना विचारा मी कोण? भाजपसह शिवसेना, काँग्रेस मीच चालवतो'; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक वक्तव्य

सुरेश खाडे यांचा महापौरपदावरील हक्क संपवला :

गत निवडणुकीत मिरजमधून भाजपचे 12 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी यामध्ये घट झाली आहे. त्यामुळे आमदार सुरेश खाडे यांची ताकद कमी झाली आहे. त्यानंतरही महापालिकेच्या गटनेतेपदी संदीप आवटी आणि स्थायी समितीच्या सभापतीपदी गणेश माळी यांना संधी देऊन भाजपने मिरजेचा महापौरपदावरचा हक्क संपविला आहे. यामुळे आमदार खाडे यांना महापौरपदासाठी दावा करण्याचा प्रश्‍नच आता उरला नव्हता.

Guardian Minister Chandrakant Patil announcing the Mahayuti alliance's candidates, Dheeraj Suryavanshi (BJP) for Mayor and Gajanan Magdum (NCP) for Deputy Mayor, at a high-level meeting in Sangli.
Sangli Politics : विश्वजीत कदमांनी पुन्हा दणका देताच 'देशमुख बंधूंचे' 'पॅचअप'; बड्या नेत्याने लक्ष घातलाच विमान जमिनीवर

धीरज सुर्यवंशी यांचा गतवेळी पराभव :

मागील निवडणुकीमध्ये भाजपने ४१ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. शिवाय २ अपक्ष सदस्यांचा पाठिंब्यामुळे भाजपचे सभागृहात ४३ सदस्य होते. त्यानंतरही अडीच वर्षानंतर झालेल्या महापौर निवडणुकीत ७ सदस्यांनी बंडखोरी केल्याने भाजपचा पराभव झाला होता. धीरज सुर्यवंशी यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी हे विजयी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com