Shivsena News : धक्कादायक! शिवसेनेचे दोन नेते अपहरण नाट्याचे 'मास्टरमाईंड' : भाजपच्या सत्तेला सुरुंग लावायला डाव रचल्याचा संशय

Shivsena News : मिरजचे पंचायत समिती सदस्य पांडुरंग इंगळे यांच्या अपहरण प्रकरणात अटकेतील चौघांनी शिवसेनेचे मोहन वनखंडे आणि अनिल शेजूळ यांची नावे घेतल्याने खळबळ उडाली आहे.
Kidnapped member Pandurang Ingale
Kidnapped member Pandurang IngaleSarkarnama
Published on
Updated on

Miraj Panchayat Samiti : मिरज तालुक्यातील बुधगावचे पंचायत समिती सदस्य पांडुरंग इंगळे यांच्या अपहरण प्रकरणात शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख प्रा. मोहन वनखंडे आणि अनिल शेजूळ यांचा सहभाग असल्याचा कबुली जबाब चौघा संशयितांनी दिला आहे. त्यामुळे या अपहरण प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषणने कसून चौकशी केल्यानंतर वनखंडे, शेजूळ यांच्या सांगण्यावरून अपहरण केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. वनखंडे व शेजूळ यांच्यावर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या कबुलीमुळे मिरजेतील सत्तांतर नाट्याला धक्कादायक वळण मिळाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग इंगळे यांचे अपहरण केल्याची तक्रार त्यांचा मुलगा अमर इंगळे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी समीर अकबर व्हनवाडे (वय २७, नरवाड), अजित मुर्ग्याप्पा कट्टीकर (२७), आनंद ऊर्फ गोटू बाबू गावडे (२७), प्रशांत बाबासाहेब क्षीरसागर (२०, तिघे मालगाव) यांना अटक झाली आहे.

इंगळे यांचे अपहरण करून त्यांना गोव्यात नेले होते. त्यामुळे मंगळवारी (10 मार्च) पंचायत समिती सभापती निवडीवेळी इंगळे गैरहजर राहिले. सभापती निवडी झाल्यानंतर रात्री त्यांना प्रथम मिरजेत आणून, नंतर सांगलीत सोडल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात आणून जबाब नोंदवला.

Kidnapped member Pandurang Ingale
Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत ट्विस्ट : महायुतीकडे बहुमत असतानाही काँग्रेसचा मोठा निर्णय

इंगळेंच्या अनुपस्थितीने बदलली सभागृहातील गणिते :

राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांनी मिरज पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता उलथवली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित घोरपडे आणि मोहन वनखंडे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत हात मिळवणी केली. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांनी एकत्र येत पंचायत समितीत सत्ता स्थापन केली.

मिरज पंचायत समितीमध्ये भाजपला 22 पैकी केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले. तर राष्ट्रवादी काँग्रेस 3, काँग्रेस 3, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 4 आणि शिवसेनेचे 2 असे 12 सदस्य विजयी झाले होते. महायुती म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे 15 सदस्य सत्ता स्थापन करतील अशी चर्चा होती.

Kidnapped member Pandurang Ingale
Miraj Panchayat Samiti : सांगली ZP अध्यक्ष निवडीआधी भाजपला मोठा धक्का : अजितराव घोरपडेंनी मिरज पंचायत समितीतील सुरेश खाडेंची सत्ता उलथवली

पण घोरपडे आणि वनखंडे यांच्या भूमिकेमुळे सत्तेसाठी चुरस निर्माण झाली होती. अजित घोरपडे यांनी त्यांचे तिन्ही सदस्य महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याचे सांगत भाजपला धक्का दिला होता. शिवाय मोहन वनखंडे यांनीही सांगली महापालिकेत सागर वनखंडे यांना डावलल्याचे उट्टे काढले.

शिवसेनेचे दोनपैकी 1 सदस्य म्हणजेच पांडुरंग इंगळे सभापती निवडीवेळी अनुपस्थित राहिले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 3, काँग्रेस 3, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 4 आणि शिवसेनेचे 1 अशा 11 सदस्यांनी एकत्र येत सभापती निवडीत भाजपचा पराभव केला. भाजपच्या राणी भोरे यांना 10 मते मिळाली. तर शिवसेनेच्या ललिता शेजुळ यांची उपसभापती निवड झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com