Bulldozer Action : पदभार स्वीकारताच नवनियुक्त आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय! 'आधी पर्याय, मग बुलडोजर'; सांगलीत मोठ्या कारवाईचे संकेत

sangli municipal commissioner sanjita mahapatra Bulldozer Action statement : नुकताच राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून सांगली महानगरपालिकेच्या आयुक्तांचीही बदली करण्यात आली आहे.
sangli municipal commissioner sanjita mahapatra
sangli municipal commissioner sanjita mahapatrasarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सांगली महापालिकेच्या नव्या आयुक्त संजिता महापात्र यांनी अतिक्रमणविरोधी कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

  2. कारवाईपूर्वी अतिक्रमणधारकांना पर्याय देण्यात येणार असून त्यानंतरच बुलडोजर वापरला जाईल.

  3. स्वच्छ आणि सुंदर सांगलीसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

sangli Bulldozer Action news : ‘‘शहरात सुरू असलेली अतिक्रमणविरोधी कारवाई सुरूच राहणार आहे. खोकीधारकांवरील कारवाईआधी त्यांना पर्याय दिला जाईल. त्यानंतरच बुलडोजर चालवला जाईल. स्वच्छ, सुंदर सांगलीसाठी कटिबद्ध असेन,’’ अशी भूमिका महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त संजिता महापात्र यांनी घेतली. आज सकाळी त्यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

आयुक्त महापात्र म्हणाल्या, ‘‘रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधांवर भर राहील. सांगलीला स्वच्छ, सुंदर बनवू. सत्यम गांधी यांनी चालवलेली अतिक्रमणावरील कारवाई सुरूच ठेवू. त्यानंतरही तिथेच अतिक्रमण झाले असेल, तर व्हिडिओ पाहून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

एखाद्या परवानाधारक खोक्यांत अवैध प्रकार चालत असेल, तर त्याचे पुरावे असल्यास थेट कठोर कारवाई करण्यात येईल. त्‍यासाठी कुणाचीही गय केली जाणार नाही. अतिक्रमणांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी पूर्णवेळ पथक स्थापन करण्यात येईल. यात नागरिकांची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे.’’

sangli municipal commissioner sanjita mahapatra
Sangli Politics : सांगलीत भाजपचा 5 वर्षात 40 जणांना नगरसेवक करण्याचा प्लॅन : शेखर इनामदारही पुन्हा महापालिकेत दिसणार?

नव्या आयुक्त म्हणाल्या, सांगली, मिरज आणि कुपवाड ही तिन्ही शहरे त्यांच्या परीने हळूहळू विकसित झाली आहेत. त्यामुळे सीमांकनात गोंधळ आहे. विकास आराखड्याचा आधार घेऊन हा प्रश्न सोडवला जाईल. शहरातील वाहनतळांचा प्रश्न गंभीर आहे. बहुमजली वाहनतळ हा चांगला पर्याय आहे. त्यासाठी योग्य जागा शोधल्या जातील.

मॉन्सूनपूर्व तयारीसाठी उद्या (ता. १६) बैठक बोलावली आहे. खरंतर नालेसफाईस सुरुवात व्हायला हवी होती. ३० एप्रिलपूर्वी नालेसफाईसाठी प्रयत्न केले जातील. शहरासाठी पाणी उपसा योग्य आहे. वितरणातील त्रुटीमुळे अडचण होते. हा गोंधळ कमी केला जाईल. महसूलवाढीसाठी प्रयत्न केले जातील. एकेका व्यक्तीकडे चार-पाच ठिकाणचा कार्यभार असल्यास तो कमी करण्यात येईल, असेही आयुक्त म्हणाल्या.

‘मॉडेल स्कूल’ उभारणार’

‘‘अमरावतीला ‘सीईओ’ असताना शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. महापालिकेच्यादेखील ५३ शाळा आहेत. त्यांची अवस्था बिकट असून पटसंख्या कमी आहे, अशी माहिती मिळाली. पुढील आठवड्यात १०० दिवसांचा कृती आराखडा तयार केला जाईल. महापालिकेच्या १० शाळा निवडल्या जातील. ‘सीएसआर’ निधीतून ‘मॉडेल स्कूल’ उभारण्यासाठी प्रयत्न केला जाईल,’’ असे मत महापात्र यांनी मांडले.

sangli municipal commissioner sanjita mahapatra
Sangli Politics : ‘स्वीकृत’साठी भाजप व काँग्रेसमध्ये ‘फिल्डिंग’, जोरदार हालचाली; राष्ट्रवादीचे दोनपैकी एका जागेवर नाव निश्चित

FAQs :

1. सांगलीत अतिक्रमण कारवाई सुरू राहणार का?
होय, आयुक्तांनी कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे.

2. कारवाईपूर्वी काय प्रक्रिया असेल?
अतिक्रमणधारकांना आधी पर्याय दिला जाईल.

3. बुलडोजर कधी चालवला जाईल?
पर्याय दिल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.

4. या कारवाईचा उद्देश काय आहे?
शहर स्वच्छ आणि सुंदर बनवणे हा मुख्य उद्देश आहे.

5. ही घोषणा कोणी केली?
सांगली महानगरपालिकेच्या आयुक्त संजिता महापात्र यांनी ही भूमिका मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com