Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेतील 'आघाडीची' सत्ता उलथवण्याच्या प्रयत्नांना सुरुंग : भाजपला मतदान केलेल्या सदस्याचा 'युटर्न'

Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेत विनायक मासाळ यांच्या राष्ट्रवादीतील पुनरागमनामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची ताकद वाढली असून भाजपला राजकीय धक्का बसला आहे.
Sangli ZP
Sangli ZPSarkarnama
Published on
Updated on

Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची ताकद आणखी वाढली आहे. अध्यक्ष-उपाध्यक्षनिवडीवेळी भाजपला मतदान केलेले करगणी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य विनायक मासाळ पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले आहेत.

विनायक मासाळ पक्षादेश डावलून अध्यक्ष निवडीवेळी माजी खासदार संजय पाटील यांच्यासोबत महायुतीला मिळाले होते. त्यांनी ‘यू टर्न’ घेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजेंद्र देशमुख, शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांच्यासोबत राहणार असल्याचे नुकतेच स्पष्ट केले आहे. माजी खासदार पाटील यांच्या तंबूतून ते पुन्हा स्वगृही परतल्याने चर्चा रंगली आहे.

सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड नुकतीच झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 सदस्य निवडून आले आहेत. यात करगणी जिल्हा परिषद गटाच्या मासाळ यांचा समावेश होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तसा पक्षाच्या गटनेत्यांनी अध्यादेश काढला होता. पण मासाळ यांनी संजय पाटील यांच्यासोबत महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला होता.

Sangli ZP
Sangli Collector : सांगलीला 'डबल' लॉटरी : जिल्हाधिकारीपदी 'संवेदनशील' अधिकारी अन् बदली झालेल्या अशोक काकडेंकडे शेतीचा चेहरा बदलण्याची जबाबदारी

मासाळ यांनी आटपाडी तालुक्यात शिवसेनेसोबत हातमिळवणी करून करगणी गटातून शिवसेनेच्या पाठिंब्यावर ते निवडून आले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत महायुती जाण्याच्या त्यांच्या निर्णयाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले होते. या पार्श्वभूमीवर मासाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा जिल्हा परिषदेवर अध्यक्ष होणार असल्यामुळे मी सोबत गेलो होतो, असे स्पष्टीकरण दिले आहे.

मासाळ म्हणाले, ‘‘मी राजेंद्र देशमुख, तानाजीराव पाटील यांच्यासोबत काम करणार आहे. भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. शिवसेनेचा अध्यक्ष होणार म्हणून मी तिकडे गेलो होतो.’’ मासाळ यांनी भूमिका स्पष्ट करून माजी खासदार संजय पाटील यांची साथ सोडून परत तानाजीराव पाटील यांच्यासोबत आले आहेत. त्यामुळे या भूमिकेची चर्चा रंगली आहे.

Sangli ZP
Sangli Collector: सांगलीला मिळाले नवे जिल्हाधिकारी; अत्यंत संवेदनशील अन् कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या हातात जिल्ह्याची सूत्र

सत्ता उलथवण्याच्या प्रयत्नांना सुरुंग?

सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीच्या संगीता पाटील यांना 34 मते, तर स्वप्नाली मासाळ यांना केवळ 25 मते मिळाली होती. पण त्यानंतर पुढच्या वर्षभरात ही सत्ता उलथवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. आता या 25 पैकी आणखी एक सदस्य कमी झाल्याने जिल्हा परिषदेतील सत्ता उलथवण्याच्या छुप्या प्रयत्नांना सुरुंग लागल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com