Shaktipeeth Highway : '...तर सरकार उलटं टांगून ठेवेल', ‘शक्तिपीठ’वरून डिवचणाऱ्या क्षीरसागरांवर राजू शेट्टींचा पलटवार, थेटच आव्हान; ‘असेल दम तर...'

Shaktipeeth Highway Raju Shetti Rajesh Kshirsagar Controversy : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीवरून माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर त्यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिलेल्या इशाऱ्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Shaktipeeth Highway; Raju Shetti And Rajesh Kshirsagar
Shaktipeeth Highway; Raju Shetti And Rajesh Kshirsagarsarkarnama
Published on
Updated on

Shaktipeeth Highway Controversy News : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीवरून जिल्ह्यात पुन्हा एकदा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता असून, महामार्गाच्या मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना चोपून काढू, असा इशारा माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला होता. त्यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा शिंदेंचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी जोरदार टीका केली होती.

क्षीरसागर यांनी, अधिकाऱ्यांना चोपून काढू म्हणणारे शेट्टी राक्षस आहेत का? असा सवाल केला होता. तसेच, सरकारने एकदा मनात घेतले, तर तुम्हाला उलटं टांगून ठेवले जाईल, अशा शब्दांत इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, माजी खासदार राजू शेट्टी यांनीदेखील पलटवार केला आहे. त्यांनी, ‘असेल दम तर टांगून दाखवाच’, असे म्हणत क्षीरसागर यांना आव्हानच दिले आहे. ते दिल्ली येथे माध्यमांशी बोलत होते.

शक्तिपीठ महामार्गावरून पुन्हा एकदा कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. यावरून मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना चोपून काढू, असा इशारा शेट्टी यांनी दिला होता. ज्यानंतर क्षीरसागर यांनी माजी खासदार शेट्टी यांचा समाचार घेत टीका केली होती.

Shaktipeeth Highway; Raju Shetti And Rajesh Kshirsagar
Shaktipeeth Highway : पांडुरंगा, मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ रद्द करण्याची सुबुद्धी द्या : महाविकास आघाडीच्या नेत्यांचे साकडे

त्यांनी, ‘शेट्टी हे राक्षस आहेत का? सरकारने एकदा मनात घेतले, तर तुम्हाला उलटं टांगून ठेवले जाईल. अधिकाऱ्यांना चोपून काढण्याची भाषा करणे इतके सोपे आहे का? अशी भाषा करणारे शेट्टी राक्षस आहेत का? सरकारने ठरवले, तर त्यांना उलटे टांगून ठेवले जाईल.’ सत्तेचा लाभ घेऊन सरकारच्या योजनांना विरोध करू नका, असा टोला लगावला होता.

क्षीरसागर यांच्या या टीकेनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी आक्रमक झाले असून, संघटनेनं सांगलीत जोरदार आंदोलन केलं. तसेच, इशारा देणाऱ्या आमदार क्षीरसागरांचा प्रतीकात्मक पुतळा झाडाला टांगून जाळला.

Shaktipeeth Highway; Raju Shetti And Rajesh Kshirsagar
Shaktipeeth Highway : आंदोलन पेटणार! तीव्र विरोधानंतरही 'शक्तीपीठ'साठी जमीन अधिग्रहणाची अधिसूचना जारी

दरम्यान, क्षीरसागर यांच्या इशाऱ्याला शेट्टी यांनी जशास तसे प्रत्युत्तर देताना, ‘असेल दम तर उलटं टांगून दाखवाच मला’, थेट आव्हानच क्षीरसागर यांना दिले. तसेच, क्षीरसागर टक्केवारीतला माणूस असून, त्याच्या एक-एक आख्यायिका या ‘कॅरिबियन नाइट्स’पेक्षाही प्रचंड आहेत. क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांच्या नादाला लागायचे कारण नाही. शेतकऱ्यांचा हिसका त्यांना अजून कळलेला नाही, असाही दम शेट्टी यांनी क्षीरसागर यांना भरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com