

Solapur, 12 May : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा परिषदेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रत्येक सोमवारी सोलापूर जिल्हा परिषदेत ‘नो व्हेईकल डे’ राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी केली आहे. ‘नो व्हेईकल डे’ राबविणारी सोलापूरची जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली ठरली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे (Solapur ZP) अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती, सर्व जिल्हा परिषद सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), सर्व विभागाचे प्रमुख हे प्रत्येक सोमवारी खासगी दुचाकी, चारचाकी आणि शासकीय वाहनांचा वापर करणार नाहीत. हे सर्वजण प्रत्येक सोमवारी सायकल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा इलेक्ट्रीक वाहनांचा वापर करणार आहेत.
इराण-अमेरिका, इस्त्राईल युद्धामुळे अनेक देशांचा इंधनाचा पुरवठा ठप्प झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशातील नागरिकांना इंधन, वायू (गॅस) काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सोने खरेदी आणि परदेश दौरे टाळावेत, असे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा परिषदेने क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. वाढते प्रदूषण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी प्रत्येक सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ साजरा करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.
याबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य म्हणाले, आम्ही घेतलेला निर्णय हा फक्त इंधन बचतीपुरता मर्यादीत नाही, तर तो पर्यावरण रक्षण, प्रदूषणाला आळा घालणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी ‘नो व्हेईकल डे’ जाहीर करून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, या निर्णयामुळे इंधन बचतीचा उद्देशही साध्य होणार आहे, असे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.