Rahuri By-Election: सगळेच अंदाज फेल! राहुरीत बिनविरोध निवडणूक नाहीच! प्राजक्त तनपुरेंनी थोपटले दंड, पक्ष मात्र गुलदस्त्यात!

Rahuri by-election 2026 News : राहुरीत मात्र पोटनिवडणुकीत चुरस पाहवयास मिळणार अशी चर्चा रंगली असल्याने सगळेच अंदाज फेल ठरले आहेत. राहुरीत प्राजक्त तनपुरेंनी दंड थोपटण्याचे संकेत दिले आहेत.
Prajakt Tanpure
Prajakt TanpureSarkarnama
Published on
Updated on

Pune News : निवडणूक आयोगाने रविवारी पत्रकार परिषद घेत पाच राज्यांसाठी विधानसभा निवडणुकाची घोषणा केली. दुसरीकडे महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या मतदारसंघांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. एकीकडे बारामतीमधील पोटनिवडणुक बिनविरोध होणार असल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे राहुरीत मात्र पोटनिवडणुकीत चुरस पाहवयास मिळणार अशी चर्चा रंगली असल्याने सगळेच अंदाज फेल ठरले आहेत. राहुरीत प्राजक्त तनपुरेंनी दंड थोपटण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे तनपुरे यांनी पक्ष मात्र गुलदस्त्यातच ठेवला असल्याने सस्पेन्स वाढला आहे.

राहुरीची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात मोठा आदर असून त्यांचे काम कुणी डावलू शकत नाही, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेच्या बाबतीत केलेल्या कामाचे देखील कौतुक केले पाहिजे, असे वक्तव्य माजी मंत्री तथा राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या मनात दोन्ही पक्षाबाबत आदर दिसत असल्याने ऐनवेळी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार याबाबत मात्र त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.

Prajakt Tanpure
Maharashtra assembly bypolls update : बारामती, राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच सीएम फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले,'निवडणूक लादली तर ....'

भाजपचे (BJP) आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेसाठी 23 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. त्याची घोषणा रविवारी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बोलताना तनपुरे म्हणाले, 'गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नेमके त्यांच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज अजून येत नाही.

Prajakt Tanpure
Sugar Factory: मोठी बातमी: पुढच्या हंगामात राज्यातील 50 टक्केच साखर कारखाने बंद होणार? शेतकरी येणार अडचणीत

दुसरीकडे तनपुरे यांनी फडणवीस यांचे कौतुक केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे शरद पवार गटाकडून उमेदवारीची देण्याची चर्चा असताना तनपुरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केलं, यामुळे तनपुरेंच्या मनात काय चालू आहे, असा सवाल उपस्थित होतोय. राहुरी पोटनिवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच निर्णय जाहीर करू, असे सांगताना तनपुरे (Prajkat Tanpure) यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने प्राजक्त तनपूरे यांच्या मनात नेमकं काय? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

Prajakt Tanpure
Mamata Banerjee : आचारसंहितेच्या काही मिनिटे आधीच ममतादीदींनी टाकला डाव, दोन मोठे निर्णय; भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फिरणार?

माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी देखील पोटनिवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. मात्र ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे अद्याप त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. तनपूरे यांनी गेल्या काही दिवसांपासून घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका आणि मुख्यमंत्र्यांचे केलेले कौतुक बघता, आगामी काळात राहुरीच्या राजकारणात काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Prajakt Tanpure
Maharashtra Politics Live Update : आंध्र प्रदेशमधील धक्कादायक घटना,फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 20 जणांचा मृत्यू

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी, यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. इतकेच नाहीतर अक्षय कर्डिले यांनी मुंबईत जाऊन वरिष्ठांच्या गाठीभेटी घेत आहेत, त्यावरून त्यांनी आपणच प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून देत आहेत. पक्ष बेरजेच्या राजकारणावर चालतो, कारण एकएक आमदार महत्वाचा असतो. ज्याला जनतेचे समर्थन असेल त्यालाच मुख्यमंत्री उमेदवारी देतील, अशी स्पष्ट भूमिका भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी मांडली आहे.

Prajakt Tanpure
Vaishnavi Jamkar suicide case : पुण्यातील धक्कादायक घटना..! लग्नानंतर आठच महिन्यात आणखी एका वैष्णवीनं संपवलं जीवन; जाचाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com