Raj Thackeray on March Cancellation : संजय राऊतांनी मोर्चा रद्द होण्याची घोषणा करताच राज ठाकरेंचा सरकारला इशारा, 'एकजुटीचा धसका..'

Raj Thackeray Sanjay Raut Hindi GR canceled : संजय राऊत यांच्या ट्विटनंतर काही वेळातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत जीआर रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच पाच जुलैला निघणाऱ्या मोर्चावर भाष्य केले.
Raj Thackeray, Sanjay Raut.
Raj Thackeray, Sanjay Raut.Sarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray News : पहिलीपासून हिंदी शिकवण्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील जीआर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रद्द केले आहेत. सरकारने जीआर रद्द केल्याने पाच जुलैला ठाकरे बंधुंच्या निघणाऱ्या मोर्चावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत फडणवीस यांनी घेतलेला शहाणपणाचा निर्णय.छान, असे म्हणत पाच जुलैला निघणार मोर्चा निघणार नसल्याचे जाहीर केले.

संजय राऊत यांच्या ट्विटनंतर काही वेळातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत जीआर रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच पाच जुलैला निघणाऱ्या मोर्चावर भाष्य केले. ते म्हणाले, 'हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे.'

राज ठाकरेंनी हिंदी लादण्या मनसेचा विरोध कसा होता हे सांगताना म्हटले आहे की, 'एप्रिलपासून या प्रश्नावर मनसे आवाज उठवत होती. तेव्हा हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. पक्षविरहीत मोर्चा काढायचे ठरल्यानंतर एका एका पक्षाने पाठींबा दिला.'

Raj Thackeray, Sanjay Raut.
Hindi imposition protest : फडणवीसांच्या निर्णयानंतर काही मिनिटांतच राऊतांनीही मोर्चाबाबत केली मोठी घोषणा

पाच जुलैला जल्लोष...

उद्धव ठाकरेंनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना भाजप खोट्याची फॅक्टरी असल्याची तसेच मराठी माणसाने एकत्र येऊ नये म्हणून ही खेळी असल्याची टीका केली. पाच जुलैला मोर्चा ऐवजी जल्लोष करायचा की सभा करायची हे लवकरच सांगतो, असे देखील त्यांनी जाहीर केले.

नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली समिती

सरकारने जीआर रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ही घोषणा करत असताना त्रिभाषेचे सुत्र ठरवण्यासाठी त्यांनी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची घोषणा केली. तसेच या समितीच्या अहवाल आल्यानंतर पुढील दिशा ठरवण्याचे सांगितले. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जीआर रद्द करून सेफ गेम खेळल्याचे मानले जात आहे.

Raj Thackeray, Sanjay Raut.
Nitesh Rane : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मोर्चाला नितेश राणेंचा खोचक टोला; मार्गही सूचवला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com