

Eknath Shinde: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीवरुनही सध्या मोठ्या प्रमाणावर राजकारण होताना पाहायला मिळतं आहे. यामध्ये शिवसेनेच्या आजी-माजी आमदारांच्या मुलांचं करिअर सेट करण्यासाठी धडपड सुरु असल्याचं चित्र आहे. यासाठी या नेत्यांनी चक्क पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडं लॉबिंगही सुरु केली आहे.
शिवसेनेतून सध्या पाच आमदार आपल्या मुलांच्या राजकीय करिअरसाठी धडपडताना दिसत आहेत. यामध्ये भरत गोगावले, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, गोपीकिशन बजोरिया आणि किशोर पाटील या आजी-माजी आमदारांचा समावेश आहे. या पाच जणांनी एकनाथ शिंदे यांच्याकडं आपल्या मुलांच्या राजकीय करिअरसाठी लॉबिंग सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या नेत्यांनी मुलांसाठी मतदारसंघही फिक्स केले आहेत.
यामध्ये रायगडमधून भरत गोगावले आल्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. तर गुलाबराव पाटील आणि किशोर पाटील हे जळगावमधून आपापल्या मुलांसाठी इच्छुक आहेत. त्यानंतर परभणी-हिंगोलीतून अर्जुन खोतकर आणि गोपीकिशन बजोरिया हे आपल्या मुलांना उमेदवारी मिळावी म्हणून धडपडताना दिसत आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या १६ जागांसाठी सध्या निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत प्राथमिक फॉर्म्युल्यानुसार महायुतीतील भाजपच्या वाट्याला १२, शिवसेनेच्या वाट्याला ३ तर राष्ट्रवादीच्या वाट्याला २ इतक्या जागा येणार आहेत. ही निवडणूक गुरुवार, १८ जून २०२६ रोजी पार पडणार असून याचा निकाल सोमवार, २२ जून २०२६ या दिवशी जाहीर होणार आहे. पण सध्या महायुतीतून मित्रपक्षांच्या तीन जागांवर भाजपनं दावा केला असून त्यावर अद्याप चर्चाच सुरु आहेत. लवकरच या जागा कोणाच्या पारड्यात पडणार हे कळू शकेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.