Shiv Sena women MLA : ... अन् शिवसेनेच्या महिला आमदार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यावरच बसल्या; काय आहे नेमके कारण?

Shiv Sena protest 2025 News : साक्री नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे.
Eknath Shinde On Badlapur Bandh
Eknath Shinde On Badlapur BandhSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : धुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महिला आमदारानी बुधवारी दुपारपासून ठिय्या मांडला आहे. तर दुसरीकडे साक्री नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे.

साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या विरोधात नगरसेवकांनी 18 जून रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. पवार यांच्या सोबतच्या काही नगरसेवकांनी विरोधी गटात दाखल होत. अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे या पार्श्वभूमीवर बुधवारी अविश्वास प्रस्तावावर चर्चा आणि मतदान होणार होते. मात्र, उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रोहन कुवर हे साक्री नगरपंचायत कार्यालयात वेळेवर उपस्थित न झाल्याने काही काळ अविश्वास प्रस्ताव आणि चर्चा प्रक्रिया रेंगाळल्याने अविश्वास प्रस्तावाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Eknath Shinde On Badlapur Bandh
Eknath Shinde mega plan : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिंदेंचा आणखी एक निर्णय; आदित्य ठाकरेंनी उभ्या केलेल्या संघटनेकडेच मोठी जबाबदारी

साक्री नगरपंचायतीमध्ये भाजपचे (BJP) 11 नगरसेवक निवडून आल्याने त्यांच्याकडे बहुमत आहे. मात्र, नगराध्यक्षांच्या विरोधात त्यांच्या कारभारासंदर्भात 6 नगरसेवकांनी तीन वर्षानंतर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी अधिकाऱ्यांच्या गैरहजर राहिल्यामुळे कोणतीही प्रशासकीय प्रक्रिया पार पाडली गेली नसल्याने अविश्वास प्रस्तावासंदर्भात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Eknath Shinde On Badlapur Bandh
Eknath Shinde : 'कॉमन मॅन' असताना दोन, चार जागांसाठी महायुती कशासाठी करायची; शिंदेंच्या शिवसेनेचा सवाल

दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी वेळेवर उपस्थित का झाले नाहीत हा देखील प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. यावेळी नगराध्यक्ष जयश्री पवार आणि त्यांच्यासोबत असलेले इतर चार ते पाच सदस्यांनी वेळ संपल्याचे सांगत निघून जाण्याचे पसंत केले. या सरकारी अनास्थेविरोधात आत्मदहन करण्याचा इशारा विद्यमान उपनगराध्यक्ष बापू गीते आणि शिंदे गटाचे नगरसेवक पंकज मराठे यांनी दिला आहे.

Eknath Shinde On Badlapur Bandh
Pune BJP News: भाजप पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच चित्रा वाघ मैदानात; ट्विट करत म्हणाल्या...

आत्मदहनाचा इशारा

दरम्यान, नगराध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव केवळ अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे बारगळला असल्याने यामागे काही षडयंत्र तर नाही ना असा देखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळेच, सरकारी अनास्थेविरोधात आत्मदहन करण्याचा इशारा विद्यमान उपनगराध्यक्ष बापू गीते आणि शिंदे गटाचे नगरसेवक पंकज मराठे यांनी दिला आहे. तर जो पर्यंत अविश्वास ठरावासंदर्भात प्रक्रिया पार पडत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला

Eknath Shinde On Badlapur Bandh
Shivsena UBT Controversial Banner : 'नामांतराची खुमखुमी असेल तर 'या' पेठेचे नाव मस्तानी पेठ करा...', 'कोथरुडच्या बाई' म्हणत ठाकरेंच्या शिलेदारांनी डिवचले

आमदाराचे ठिय्या आंदोलन

साक्री विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना (Shivsena) शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याशी चर्चा करण्यासाठी या जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. मात्र, या ठिकाणी आल्यानंतर जिल्हाधिकारीच उपस्थित नसल्याने आमदार मंजुळा गावित यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवरच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

Eknath Shinde On Badlapur Bandh
Pune BJP News: भाजप पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच चित्रा वाघ मैदानात; ट्विट करत म्हणाल्या...

यंत्रणेवर कोणाचा तरी दबाव

साक्रीच्या नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून ठोस आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत याठिकाणावरून न उठण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. अविश्वास ठरावाची निवडणूक ही कोणाच्या तरी दबावाखाली होऊ दिली नसल्याचा आरोप आमदार गावित यांनी केला आहे.

Eknath Shinde On Badlapur Bandh
Bombay High Court decision: मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का; 76 लाख वाढीव मतदानाच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com