

Maharashtra State Transport update : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर मंगळवारी सायंकाळी केमिकल टॅंकरचा अपघात झाल्यापासून या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. कालपासून ही यंत्रणांनाही ही कोंडी फोडता आलेली नाही. त्यामुळे मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणारा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, अनेक नागरिक वाहनांमध्ये अडकून पडले असून एसटी प्रवाशांचेही प्रचंड हाल सुरू आहेत.
टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचा मोठा फटका महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळालाही बसला आहे. यापार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये 37 ई-शिवनेरी व 66 इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे.
एक्सप्रेस वेवर एसटीची एकूण 163 वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील 46, सोलापूर विभागातील 36, पुणे विभागातील 20, सांगली विभागातील 18, कोल्हापूर विभागातील 13, पालघर विभागातील 12, ठाणे विभागातील 11 आणि मुंबई विभागातील 7 वाहनांचा समावेश आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे स्पष्ट करत परिवहन विभागाने म्हटले आहे की, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, तोवर प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
प्रामुख्याने मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक खोळंबली आहे. पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. खालापूर टोलनाक्यापासून मुंबईच्या दिशेने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांकडून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा वापर केला जात आहे. परिणामी या मार्गावरही अनेक ठिकाणी वाहतूककोंडी होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.