Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार,महाराष्ट्रातून बड्या नेत्याला मिळणार संधी, बैठकीत...

BJP Shivsena NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएससोबत जाणार की नाही याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात त्याचे देखील परिणाम दिसून येतील, अशी असे बोलले जात आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Cabinet Reshuffle : अनेक दिवसांपासून रखडेलेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची माहिती आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या एनडीएतील मित्रपक्षांसोबत चर्चांच्या फेरी संपत आल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार हे समोर येणार आहे. महाराष्ट्रातून मित्रपक्षातील बड्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते अशी चर्चा आहे.

भाजप आणि मित्रपक्षांच्या चर्चेच्या फेऱ्यांमध्ये एनडीएसोबत येणाऱ्या मित्रपक्षांना केंद्र आणि राज्यात मंत्रिपदे देण्याची शक्यता आहे. तर अनेक केंद्रीय मंत्र्यांची उचलबांगडी होण्याचे संकेत देखील देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएससोबत जाणार की नाही याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. विलीनीकरण न करता एनडीएसोबत जावे, असे काही नेत्यांचे मत असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले होते. मात्र, आपला पक्ष इंडिया आघाडीसोबत असल्याचे पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते सांगत आहे. विलीनीकरणाची चर्चा पक्षाच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी फेटाळल्या आहेत.

महाराष्ट्रातील मंत्री डेंजर झोनमध्ये

मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भाजपमधून एका राज्यमंत्र्याच्या पत्ता कट होण्याची देखील चर्चा आहे. या मंत्र्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मात्र, निवडणुकीमधील जातीय समीकरणांचा विचार करता या मंत्र्याचे मंत्रिपद कायम राहणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे भाजप वरिष्ठ नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Narendra Modi
BJP Leader Murder : राजकारणाचा रक्तरंजित चेहरा! एका फोननंतर बोलावून घेतलं अन् लोखंडी रॉडने संपवलं; भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ...

संजय जाधव यांना मंत्रिपद फिक्स

एकनाथ शिंदेंच्या वाट्याला दोन केंद्रीय मंत्रि‍पदे येण्याची शक्यता आहे. जे ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंसोबत आले त्यातील कोणाला मंत्रिपद मिळणार याची चर्चा आहे. त्यामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. तर, श्रीकांत शिंदे यांना देखील केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

Narendra Modi
NCP merger talks : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी दिल्लीत वेगवान घडामोडी? सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेलांमध्ये 35 मिनिटे चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.