Ajit Pawar And Shivsena In Jalgaon : शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना प्रथम साथ देणाऱ्या आमदारांत जळगाव जिल्ह्यातील चिमणराव पाटील आणि किशोर पाटील यांचा समावेश होता. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. आता राज्य सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली आहे. परिणामी मुख्यमंत्री शिंदे यांना साथ देऊनही चिमणराव आणि किशोर पाटील यांचे नाव मंत्रिमंडळाच्या यादीत कुठेही दिसत नाही. परिणामी या दोघांसाठी आता मंत्रिपद प्रतिक्षाच ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे. (Latest Political News)
जळगाव जिल्ह्यात शिवसेना फुटीचा मोठा फटका पक्षाला बसला होता. पक्षाचे चार आमदारांसह शिवसेनेला पाठिंबा देणारे एक अपक्ष आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडले. परिणामी जळगावत जिल्ह्यात आता शिवसेनेचा (ठाकरे गट) एकही आमदार राहिलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला जळगाव जिल्ह्यातील आमदारांनी पहिल्यापासून साथ दिली. त्यामुळे जिल्ह्याला मंत्रिमंडळात चांगले स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. शिंदे गटाच्या माध्यमातून जिल्ह्यात दोन मंत्रिपद मिळण्याची शक्यताही होती.
शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जळगावला गुलाबराव पाटील यांच्या रुपाने मंत्रिपद मिळाले आहे. मात्र नवीन विस्तारात आमदार किशोर पाटील किंवा चिमणराव पाटील यांच्यापैकी एकाचा तरी सामावेश होईल, अशी अपेक्षा होती. पाचोरा येथील आमदार किशोर पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अगदी विश्वासातील मानले जातात. अनेक कारणांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी पाचोरा येथे दौरे केले आहेत. मुख्यमंत्री होण्यापूर्वी शिंदे अचानकच विमानाने जळगाव येथे येवून ते थेट पाचोरा येथे गेले होते. आमदार किशोर पाटील यांच्यासमवेत एका मंदिरात जावून त्यांनी पूजाही केली होती.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी पहिल्या फळीत किशोर पाटीलही होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा पाचोरा तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात होती. तर पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत.शिवसेना फुटीत त्यांनीही पहिल्या फळीतच शिंदे यांना साथ दिली होती. यामुळे त्यांना पहिल्याच मंत्रिमंडळात संधी मिळण्याची आशा होती. ती संधी हुकल्याने नव्या मंत्रिमंडळ विस्तारात नक्कीच संधी मिळेल, असेही मतदार संघातील त्याचे समर्थक ठामपणे सांगत होते.
राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा असताना या दोन्ही आमदारांच्या नावाची साधी चर्चाही दिसून येत नाही. त्यामुळे मतदारसंघातील त्यांचे समर्थक आता कुजबूज करू लागले आहेत. आपल्या नेत्याला आता मंत्रीपदाची संधी मिळत नसल्याचे दिसत असल्याने मतदारसंघात समर्थकांचा नाराजीचा सूर आहे. आता सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामुळेच चिमणराव पाटील आणि किशोर पाटलांना डावलले जात असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. तरीही दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्त्यांना अद्यापही आपल्या नेत्याला मंत्रिपदाची संधी मिळेल अशी अपेक्षा असल्याचे चित्र दिसत आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.