Nashik LokSabha Constituency : लोकसभा जागावाटपाबाबत भुजबळ जरा स्पष्टच बोलले...

Chhagan Bhujbal on candidates : लोकसभा मतदारसंघात जागावाटपाबाबत जे विरोधकांमध्ये सुरू आहे, तेच महायुतीत सुरू आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News :

नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्यावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे. महायुतीचे मनोमिलन मेळावे राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्यात महायुतीतील अंतर्गत धुसफूस, नाराजीनाट्य समोर आले. याबाबत अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता, त्यांनी स्पष्टच सांगितले.

जागावाटपाबाबत जशी आमची स्थिती आहे, तशीच स्थिती विरोधकांची आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ यापासून दूर नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्पष्ट केले. यावरून महायुतीत उमेदवार देण्यावर धुसफूस असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : 'पंतग कसे कापतात, याचं ट्रेनिंगच घेतलंय' ; छगन भुजबळांचं सूचक विधान!

छगन भुजबळ येवल्यात पतंग महोत्सवासाठी आले होते. यावेळी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मनमोकळा संवाद साधला. 'गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र लढले होते, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्ष सोबत होते. आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे पक्षातील इच्छुक, यापूर्वी विजयी झालेले, पराभूत झालेले असे अनेक आहेत. या सर्वांना सोबत घेऊन पुढे जावे लागणार आहे.'

म्हणून देवरांनी काँग्रेस सोडली...

जागावाटपातील नव्या-जुन्यांचा मिलाफ करण्याची भानगड फक्त महायुतीत नाही. दक्षिण मुंबई लोकसभेसाठी ठाकरे गटाचे खासदार प्रतिनिधित्व करतात. ही जागा काँग्रेसची असल्याने मिलिंद देवरा (Milind Deora) पक्षातून बाहेर पडून शिवसेनेत आले. जागावाटपात जशी आमची स्थिती आहे, तशीच परिस्थिती विरोधी पक्षातही असल्याचे भुजबळ म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत विचारणा केली असता, याला नाशिक लोकसभा (Nashik Loksabha Constituency) मतदारसंघाचा अपवाद नसल्याने भुजबळांनी एका वाक्यात स्पष्ट केले. सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे (Hemant Godse) नाशिकचे खासदार आहेत. तिसऱ्या टर्मसाठी ते इच्छुक आहेत. मात्र, जागावाटपात राष्ट्रवादीचा अजित पवार गट इच्छुक आहे. शिवाय भाजपची नजर या मतदारसंघावर आहेच.

वास्तविक यापूर्वी या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना (ShivSena) अशी लढत व्हायची. यात एकदा समीर भुजबळ यांनी, तर दोन वेळा गोडसे यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे या जागेवर नक्की कोणत्या पक्षाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भुजबळांच्या या उत्तरामुळे माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) लोकसभा निवडणूक लढवणार की नाही किंवा लढणार तर कुठून, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Chhagan Bhujbal
Uddhav Thackeray : नाशिकच्या अधिवेशनासाठी उद्धव ठाकरेंचा मोठा डाव; ग्रामीण भागात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com