Raver Lok Sabha Constituency : रावेर लोकसभेत बावनकुळेंचे ‘डॅमेंज कंट्रोल’; चंद्रकांत पाटील करणार रक्षा खडसेंचा प्रचार

Lok Sbaha Election 2024 : रावेर मतदारसंघातील मुक्ताईनगरचे अपक्ष व शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे महायुतीत आहेत. खडसे यांच्याशी राजकीय वाद असल्यामुळे त्यांनी रक्षा खडसे यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. आमदार पाटील यांच्या या निर्णयामुळे रक्षा खडसे यांना मुक्ताईनगर मतदार संघात फटका बसण्याची शक्यता होती.
Chandrakant Patil- Raksha Khadse-Chandrashekhar Bawankule
Chandrakant Patil- Raksha Khadse-Chandrashekhar Bawankule
Published on
Updated on

Jalgaon, 3 May : रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांच्या विजयाची हॅट्‌ट्रीक साधण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महायुतीतील मुक्ताईनगरचे शिवसेना शिंदे गट समर्थक अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्याशी असलेल्या विरोधामुळे रक्षा खडसे यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. परंतु प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुक्ताईनगरमध्ये जाऊन आमदार पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर केली असून आता ते प्रचारात सहभागी होणार असल्याचे सांगितले.

रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा देऊन सून रक्षा खडसे यांच्या प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या भाजपतील प्रवेशाबाबत चर्चा सुरू असल्या तरी त्याची प्रक्रिया कधी होईल, याबाबत साशंकताच आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrakant Patil- Raksha Khadse-Chandrashekhar Bawankule
Eknath Khadse News : पक्षप्रवेश 'पेंडिंग',पण खडसेंची भाजपच्या प्रचारात 'एन्ट्री'; महाजन म्हणतात, 'ते राष्ट्रवादीचे...'

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या भाजप प्रवेशाबाबत केंद्राकडे अंगुलीनिर्देश केला आहे. तरीही एकनाथ खडसे यांनी भाजप उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे पक्षासाठी ही जमेची बाजू मानली जात आहे. परंतु याच मतदारसंघातील मुक्ताईनगरचे अपक्ष व शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे महायुतीत आहेत.

खडसे यांच्याशी राजकीय वाद असल्यामुळे त्यांनी रक्षा खडसे यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. आमदार पाटील यांच्या या निर्णयामुळे रक्षा खडसे यांना मुक्ताईनगर मतदार संघात फटका बसण्याची शक्यता होती. मात्र, भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज मुक्ताईनगरात दाखल झाले, त्यांनी थेट आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

Chandrakant Patil- Raksha Khadse-Chandrashekhar Bawankule
Dispute In Mahayuti : खासदार लोखंडे कोण? आमदार काळेंच्या कार्यकर्त्याच्या प्रश्नावरून गोंधळ

त्या भेटीनंतर बावनकुळे म्हणाले, चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात स्थानिक पातळीवर मतभेद आहेत...मनभेद नाहीत. मात्र, या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करून देशाचा विकास करायचा आहे. त्यासाठी मतभेद विसरून प्रचारास सहभागी होण्याचे आपण आमदार चंद्रकांत पाटील यांना आवाहन केले आहे. आमदार पाटील यांनीही त्याला प्रतिसाद दिल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या संकल्पनेला साथ देण्यासाठी आमदार पाटील यांनी भाजप उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार करून मुक्ताईनगरमधून मोठा लीड देण्याबाबत आश्‍वासित केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Chandrakant Patil- Raksha Khadse-Chandrashekhar Bawankule
Vitthal Sugar Factory : अभिजित पाटलांना दिलासा; ‘विठ्ठल’वरील कारवाई मागे, पाच तारखेपर्यंत गोदामे ताब्यात मिळणार

रावेर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे आमदार चंद्रकांत पाटील भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात नसल्यामुळे अनेक चर्चा होत होत्या, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: मुक्ताईनगरमध्ये येवून आमदार पाटील यांच्या मनातील शंका दूर करून त्यांना प्रचारात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले. रावेर लोकसभा मतदार संघात असलेला मोठा ‘डॅमेज कंट्रोल’ त्यांनी केला असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच मनोमिलन झाले कि नाही, हे दिसून येईल. पण, सद्या तरी आमदार चंद्रकांत पाटील यांची भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी सहमती असल्याचे दिसून येत आहे

Edited By : Vijay Dudhale

Chandrakant Patil- Raksha Khadse-Chandrashekhar Bawankule
Solapur Lok Sabha 2024 : राम सातपुतेंवर मिम्स बनवणे आले अंगलट; काँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com