MLA Disqualification Case : नार्वेकरांनी दिलेला निर्णय फारसा... : बबनराव घोलप काय म्हणाले ?

Shivsena Maharashtra Politics: सर्व आमदारांना पात्र घोषित केल्याने माजी मंत्री बबनराव घोलप यांनी खंत व्यक्त केली.
Baban Gholap
Baban GholapSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आक्षेप घेतलेल्या सर्व आमदारांना पात्र घोषित केल्याने शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री बबनराव घोलप यांनी खंत व्यक्त केली.

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या अपात्रतेबाबत दिलेल्या निर्णयाने राजकीय क्षेत्रात फारसा धक्का बसलेला नाही. ज्याचे सरकार ते सरकार टिकविण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो, त्यासाठी कायदेशीर तरतुदींचा आधार सोयीनुसार घेतो, हा निर्णय त्यादृष्टीनेच झालेला आहे, अशी प्रतिक्रिया राज्यातील नागरिकांमध्ये व्यक्त झाली आहे, असे संकेत विविध कायदेतज्ज्ञांकडूनदेखील व्यक्त झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Baban Gholap
MLA Disqualification Case : ठाकरेंचा थयथयाट, तर पवारांचे राजकारण उघडे पडले; मंत्री विखेंचा मार्मिक टोला

यासंदर्भात माजी मंत्री बबनराव घोलप यांनी हा निर्णय फारसा अनपेक्षित नव्हता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात जाऊन योग्य तो आणि खरा न्याय काय आहे, याबाबतचा निकाल घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील फुटीनंतर बंड केलेल्या आमदारांबाबतच्या अपात्रतेविषयी दिलेल्या निकालाने राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या निकालाला निश्चितच सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, अशी अपेक्षा आहे.

निकालाच्या निर्णयावर राऊत काय म्हणाले ?

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी (दि. 10 जानेवारी) शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय देत नार्वेकरांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. या निकालानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या निकालावर खासदार संजय राऊत यांनीही मोठं भाष्य केलं आहे.

'बाळासाहेबांच्या शिवसेनेने तुम्हाला मोठे केले. तुम्ही डरपोक असल्यामुळे पक्ष सोडला आणि आता तुम्हाला हे कबूल करण्याचीही हिंमत नाही. शिवसेना सहजासहजी कोणाला घेता येणार नाही,' असा निशाणा संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर साधला.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

Baban Gholap
MLA Disqualification Case : राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं : संजय राऊतांचा गंभीर आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com