Shocking Case : साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या तरुणीसोबत धक्कादायक प्रकार! भक्त निवासातच विनयभंग, कंत्राटी कर्मचारी फरार; गुन्हा दाखल

Woman Molestation Case at Shirdi Sai Baba Bhakta Niwas : शिर्डीतील साई संस्थानच्या भक्त निवासात आता महिला भाविक सुरक्षित नसल्याचा प्रकार समोर आला असून येथे एका कंत्राटी कर्मचाऱ्याने भाविक तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Shirdi Sai Sansthan
Shirdi Sai Sansthansarkarnama
Published on
Updated on

Shirdi News : शिर्डीत साईबाबा संस्थानच्या भक्त निवासातच एका २० वर्षीय भाविक तरुणीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीनंतर कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तर अमन पठाण (रा. वाळकी, ता. राहाता) असे आरोपीचे नाव असून याच्या विरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेनंतर येथे खळबळ उडाली आहे. यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून कारवाईची मागणी केली जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित २० वर्षीय तरुणी पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती ४ जून रोजी पश्चिम बंगाल येथून कुटुंबीयांसोबत शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आली होती. तर ती आपल्या कुटुंबीयांसोबत साई संस्थानच्या भक्त निवासात थांबली होती. दरम्यान ५ जून रोजी पीडितेचे आई-वडील आणि बहीण साईबाबांच्या दर्शनासाठी गेले असता. ती रूममध्ये एकटीच होती.

याचवेळी तिच्या रूमची बेल आरोपी अमन पठाण याने वाजवली. तसेच पीडितेने दरवाजा उघडताच मला तुझ्याशी बोलायचे आहे, मी रूममध्ये येऊ का? अशी विचारणा केली. यावर पीडित मुलीने नकार देताच त्याने तिला रूम नंबर २०४ जवळ येण्यास सांगितले.

Shirdi Sai Sansthan
Crime Case : तब्बल 16 वर्षांनंतर 6 अधिकाऱ्यांना दणका : बोगसगिरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

ती पीडिता रूम नंबर २०४ जवळ जाताच आरोपी अमन पठाण याने तिचा हात धरला आणि तिला रूममध्ये ओढले. यानंतर तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केला. तर आपला मोबाईल नंबर पीडितेला देत आपले नाव अमन पठाण असल्याचे सांगितल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेनंतर शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अमन पठाण फरार झाला आहे. तर त्याचा शोध पोलिस घेत असून या घटनेनं आता शिर्डीत खळबळ उडाली आहे. तर आता बाबांच्या दर्शनाला येणाऱ्या महिला देखील सुरक्षित नसल्याची चर्चा होताना दिसत असून भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Shirdi Sai Sansthan
Ashok Kharat Shirdi case : अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात; शेतकरी फसवणूक ते ‘समता’तून फिरलेल्या काळ्या पैशाचं रहस्य उलगडणार?

एकीकडे या घटनेनंतर आता साई संस्थान प्रशासनाने तात्काळ पावले उचलत कंत्राटी सफाई कर्मचारी अमन पठाण याचे निलंबन केले आहे. तर दुसरीकडे या घटनेवरून हिंदुत्ववादी संघटनांनी शिर्डीत तीव्र संताप व्यक्त करत निषेध केला आहे. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com