Shivsena BJP Politics : शिवसेनेने नवापूर पिंजून काढले...गावागावांत ‘होऊ द्या चर्चा’

Shivsena leaders criticized BJP & it`s alliance members-नवापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये शिवसेनेने राबविले ‘होऊ दे चर्चा’ अभियान
Prof. Sharad Patil at Navapur
Prof. Sharad Patil at NavapurSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena Navapur News : आगामी काळात केवळ भाजपच नव्हे तर जे जे भाजपला मदत करतील, त्यांचाही पराभव होईल, असा विश्वास माजी आमदार, प्रा. शरद पाटील यांनी व्यक्त केला आहे. (Shivsena Thackeray Group starts a drive against BJP in Dhule Sistrict)

शिवसेनेतर्फे (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackeray) ‘होऊ दे चर्चा’ अभियान राबविण्यात येत आहे. याबाबत नवापरू तालुक्यात झालेल्या कार्यक्रमांत भाजपच्या (BJP) धोरणांवर टीका करण्यात आली.

Prof. Sharad Patil at Navapur
Sunil Tatkare News : तटकरेंचा शरद पवारांवर कटाक्ष; यापूर्वी पक्षात संवादाची भूमिकाच नव्हती!

या वेळी पक्षाच्या विविध नेत्यांनी नागरिकांशी संवाद साधला. प्रा. पाटील म्हणाले, केंद्रातल्या सरकारने ज्या योजना राबवल्या त्या जनतेसाठी नव्हे तर जनतेचे शोषण करण्यासाठी होत्या. याची जाणीव जनतेला झाली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आगामी काळात भाजपला जे मदत करतील, त्यांचाही पराभव झाला पाहिजे, असा निर्धार प्रत्येकाने केला पाहिजे.

केंद्रातील मोदी सरकार किती फसव्या योजना राबविते हे जनतेसमोर आणले पाहिजे. केंद्र, राज्य सरकारच्या फसव्या योजनांचा भांडाफोड कार्यक्रम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने हाती घेतला आहे. येणाऱ्या काळात भाजपव्यतिरिक्त अन्य राजकीय पक्षांचे सरकार सत्तेत आले पाहिजे.

ते म्हणाले, की दर वर्षी दाेन लाख रोजगार उपलब्ध करू, असे आश्वासन देऊन सत्तेत आलेले मोदी सरकार फसवे निघाले. युवकांनी आपल्या आयुष्याची २४ ते २५ वर्षे शिक्षणात घालवली. शिक्षण घेऊन आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची अपेक्षा त्यांच्या उपेक्षा ठरल्या आहेत. अनेक वर्षांपासून नोकरभरती नाही. पेन्शन द्यायची नाही म्हणून नोकऱ्या संपुष्टात आणल्या जात आहेत.

Prof. Sharad Patil at Navapur
Ajit Pawar News : कांदे फेकलेच नाहीत, अन्यथा मी त्यांना भेटलो असतो ना!

या उपक्रमात नंदुरबार जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील, जिल्हा परिषद सदस्य छोटू पाटील, शहरप्रमुख अनिल वारुडे, तालुकाप्रमुख कल्पित नाईक, जिल्हा उपसंघटक मनोज बोरसे, किसन शिरसाठ, युवासेना उपजिल्हधिकारी दिनेश भोई, देवका पाडवी, दिनेश खैरनार, दर्पण पाटील, मनोज वाडिले, सचिन चौधरी यांसह मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले.

Prof. Sharad Patil at Navapur
Jarange Patil & Bhujbal : जरांगे पाटील फक्त मलाच का टार्गेट करीत आहेत?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.